जिल्हा परिषद पिंपरी महिपाल शाळेला आमदारांनी दिले 15 लाखाचे काम !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी महिपाल येथे नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री. बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप (स्कूल बॅग, 6वह्या, 6पेन, पाणी बॉटल,कंपास पेटी) केले. याप्रसंगी विस्तार अधिकारी सौ.लता कोठेकर, केंद्रप्रमुख श्री.घोडजकर सर, सरपंच श्री.हनुमानजी चंदेल, शा. व्य. स. अध्यक्षा सौ.मनीषा ताई पोहरे, श्री. बालासाहेब कच्छवे, श्री. पौळ सर, श्री.कमलेश कदम, पोलिस पाटील श्री.भारत कदम, सर्व ग्रामपंचायत सदस्य,सर्व शिक्षक, सर्व अंगणवाडी कर्मचारी, सुपरवायझर सौ.पाटील मॅडम,ग्रामसेवक मॅडम,सर्व गावकरी आणि बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
अतिशय उत्साहवर्धक वातावरणात कार्यक्रम पार पडला,कार्यक्रमाचे आकर्षण मेंदूची व्यायाम शाळा या विषयावर कच्छवे सरांचे व्याख्यान होते तर आमदार साहेबांनी 15 लाख रुपांची भेट शालेय कामासाठी दिली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच हनुमान चंदेल यांनी केले , सूत्रसंचालन रामगिरवार सरांनी तर आभार प्रदर्शन श्री.सोनटक्के सरांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .