सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा तथा निळा केंद्राची दुसरी संयुक्त शिक्षण परिषद आलेगाव (उ.) येथे संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



श्रीमती शामला खडकेकर या शिक्षिकेचा सेवापूर्ती निमित्त दिला निरोप !

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेगाव(उ) येथील प्राथमिक शिक्षिका श्रिमती शामला खडकेकर मॅडम या आज नियवयोमानानुसार वयाची 58 वर्षे यशस्वी रित्या पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्या.त्यांच्या सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्या  निमित्ताने 2023-24 मधील दुसरी शिक्षण परिषद ही केंद्रातील आलेगाव उत्तर,आलेगाव दक्षिण आणि कांचन नगर या शाळांनी संयुक्तरित्या आजच्या शिक्षण परिषदेचे आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निळा केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री. कैलास पोहरे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निळा बीट च्या शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्रिमती लता कौठेकर मॅडम , प्रा.शा.पुयनी चे पदोन्नत मुख्याध्यापक श्री शंकर पडगिलवार सर,प्रा.शा.मरळक बु.च्या मुख्याद्यापिका आदरणीय वाटेगावकर मॅडम ,प्रा.शा.एकदरा चे पदोन्नत मुख्याध्यापक श्री श्रीकांत कुलकर्णी सर,निळा केंद्राचे माजी केंद्रप्रमुख श्री. धोपटे सर ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री वाघमारे सर,निळा केंद्राचे माजी मु.अ. आदरणिय निळकंठराव चोंडे सर हे होते.

        प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून मान्यवरांचा स्वागत समारंभ सोहळा पार पडला.सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक आलेगाव उत्तर चे मुख्याध्यापक श्री खाडे सर यांनी केले.

         आजच्या या सेवापूर्ती सोहळ्या निमित्या प्रमुख पाहुणे व आप्तेस्ठांची मनोगते व्यक्त झाली. माजी केंद्रप्रमुख श्री धोपटे सर यांनी मॅडमच्या कंधारतालुक्यातील कार्याच्या गौरव आपल्या मनोगतातुन व्यक्त केला.

      पदौन्नत मु.अ.श्री पडगिलवार सर सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य कसे जगले पाहीजे या विषयी आपले मनोगत व्यक्त केले., मॅडमच्या बहिण श्रिमती प्रमिला खडकेकर मॅडम यांनी व्यक्तीच्या आयुष्यातील 16 संस्कारापैकी सेवापूर्ती हा सुध्दा खूप महत्वाचा संस्कार आहे आणि आपल्या बहिणीचा हा सोहळा मोठ्या थाटात संपन्र होतोय अशीच भावना त्यांनी त्यांच्या मनोगतातुन व्यक्त केली.



       मॅडम चे व्याही श्री.पाठक साहेब यांनी ही या आजच्या सोहळ्याच्या आयोजनाविषयी आपल्या मनोगतातुन समाधान व्यक्त करुन मॅडम चे भावी आयुष्य निरामय व आरोग्य संपन्र जावो अशा भावना व्यक्त केल्या. पडगिलवार सर,लांडगे सर,कौठेकर मॅडम आणि पोहरे सर यांनी शुभेच्छा पर आपले मनोगत व्यक्त केले. वैशाली नगरचे स.शि.श्री.शिवकुमार लांडगे सरांनी आपल्या चारौळ्यातुन काव्यमय सेवावृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.

       आजच्या मंगलमय प्रसंगी निळा केंद्राचे सेवानिवृत केंद्रीय मु..अ. आदरणिय निळकंठराव चोंडे सरांनी आपल्या मनोगतातुन मॅडमच्या कार्याचा गौरव केला या प्रसंगी गावकर्‍यांच्या वतीने श्री.बालाजी पाटील यांनी मॅडमच्या कार्याचा आपल्या मनोगतातुन गौरव केला.

      आजच्या या सेवापूर्ती कार्य गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणिय  श्री.कैलास पोहरे सरांनी अध्यक्षिय समारोप करतांना  म.बुध्दांनी सांगितलेले मानवी जीवनाचे सत्य आपल्या शब्दात सांंगुन ग्रामिण कथाकार श्री.ग.पी. मनुरकर यांच्या एका फक्कड ग्रामीण कथेच्या समर्पक संदर्भातुन गुरुचं महत्व पटऊन देणार्‍या कथेने  कार्यक्रमाचा समारौप केला.

        केंद्राच्या वतीने मॅडमला एक ओहन भेट दिली,तर व्यवस्थापन समिती आलेगाव आणि समस्त गावाकऱ्यांच्या वतीने मॅडम ला कपडेरूपी आहेर भेट करून सन्मान केला हा सोहळा पाहुन श्रिमती शामला खडकेकर मॅडमला गहिवरून आले व त्यांच्या डौळ्यातुन आनंदाश्रु टपकत होते.

       तत्पूर्वी पहिल्या सत्रात आजच्या शिक्षण परिषदेच्या ऑनलाईन तासिकेस सर्व शिक्षक युट्यूब लिंकवर जॉईन झाले.आणि आजचे शैक्षणिक उद्धीष्ट पूर्ण केले.



        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद फुलारी सर  व रामगीरवार सर यांनी केले.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.खाडे सर ,श्री.डांगे सर श्री.डोईफोडे सर व त्यांचे सहकारी व गावकर्‍यांनी परीश्रम घेतले तर आभार प्रदर्शन श्री कामाजी डांगे सर यांनी केले.

        अशा या निसर्ग रम्य ठीकाणी रूचकर अशा भोजनाचा अस्वाद सर्व उपस्थीतांनी घेतला या प्रसंगी आलेगाव उ. अध्यक्ष-वामनराव शिंदे ,आदिनाथ शिंदे,तुकाराम शिंदे,अंकुश शिंदे.बालाजी सुर्यवंशी,शंकर शिंदे,गंगाधर शिंदे,पंढरीनाथ शिंदे,अनिल शिंदे,गंगाधर बोखारे,राजाराम शिंदे, उत्तम शिंदे आणि डांगे सर,डोईफोडे सर, पतंगे सर यांनी परिश्रम केले आणि मोलाचे सहकार्य कैले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)