वेळापत्रके अधिकृत नाहीत...
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावी आणि बारावी या परीक्षांची वेळापत्रके जोमाने व्हायरल होत आहेत. त्यामुळे पालकांकडून सातत्याने विचारणा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने या वेळापत्रकांशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या या वेळापत्रकांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही मंडळाने केले आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावी या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली वेळापत्रके पालकांनी ग्राह्य धरू नयेत, असे मंडळाने आपल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. तसेच मंडळाचा लोगो अथवा नावाचा वापर करून परीक्षेबाबत चुकीची माहिती प्रसारित करून पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यात संभ्रम निर्माण केल्यास त्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .