नागपूर ( शालेय वृत्तसेवा ) :
अखिल भारतीय सेवा व राज्य सेवेतील अ,ब, क आणि ड गटातील सेवक आणि कर्मचारी यांच्याकरीता एखाद्या पदावरील कालावधी तीन वर्षाचा करून, या बदल्या वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यासंदर्भातील विधेयक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत मांडण्यात आले. त्यास सभागृहाने मंजुरी प्रदान केली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे विधेयक मांडले. लोकसभा निवडणूक २०२४ साठी १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचासंहिता लागू होती. ती ४ जून २०२४ पर्यंत अंमलात होती. त्यामुळे या बदल्या रखडल्याने, यासंदर्भात अध्यादेश काढण्यात आला होता. तो कालावधी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आला होता.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .