राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची ओळख करून देण्यासाठी एसईआरटीकडून आयोजन
पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्यातील वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणीस पात्र असलेल्या शिक्षकांना २ ते १५ जूनदरम्यान राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची ओळख करून देण्यासाठी पुणे जिल्ह्यातून वरिष्ठ वेतन श्रेणीस १४३३ आणि निवड वेतनश्रेणीसाठी १०६१ शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक वर्गात ४० ते ६० शिक्षकांचा समावेश असणार आहे.
प्रशिक्षणासाठी दररोज चार तासांचा कालावधी असेल आणि एकूण प्रशिक्षण १० दिवसांचे असेल. मार्गदर्शनासाठी चार तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यात ३० पेक्षा कमी प्रशिक्षणार्थी असलेल्या तालुक्यांतील शिक्षकांचे प्रशिक्षण शेजारील तालुक्यात घेण्यात येणार असून, याची जबाबदारी संबंधित 'डाएट'वर सोपविण्यात आली आहे.
६० शिक्षकाचा याप्रमाणे शिक्षकांना एक वर्ग १०६१ प्रशिक्षण :
प्रत्येक तासानंतर एससीईआरटीकडून १० गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी ऑनलाइन घेण्यात येईल. याशिवाय लेखी चाचणी, स्वाध्याय व कृती संशोधन या घटकांचेही मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्रत्येक घटकात किमान ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. सर्व अटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांनाच एससीईआरटीतर्फे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतरच शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.
प्रशिक्षणात असणार चार गट :
प्राथमिक गट इयत्ता १ ते ८ वी च्या शिक्षकांचा माध्यमिक गट इयत्ता ९ ते १०वी शिक्षकांचा उच्च माध्यमिक गट ११ आणि १२वी च्या शिक्षकांचा अध्यापक विद्यालयासाठींचा आणि पुन्हा निवडसाठी दोन गट एक कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक हे प्रशिक्षण १६ जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या आधीच पूर्ण होणार असल्याने नवीन अभ्यासक्रम राबविताना शिक्षकांना अडचणी येणार नाहीत. प्रशिक्षणासाठी शंभर टक्के उपस्थिती आवश्यक असून, शिक्षकांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .