नांदेड / मुदखेड ( शालेय प्रतिनिधी ) :
दि. १४ मे — आज शेंबोली गावात "ग्राम दरबार - एक दिवस गावकऱ्यांसोबत" उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गावकऱ्यांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
ग्राम दरबारात शिक्षण, आरोग्य, रोजगार, बचत गट, सामान्य प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या योजनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संबंधित विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक आणि कर्मचारी यांनी आपल्या-आपल्या विभागातील योजनांची माहिती दिली तसेच उपस्थित ग्रामस्थांच्या शंका आणि प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
कार्यक्रमादरम्यान महिला बचत गटांना प्रशिक्षण, स्वरोजगार संधी, आरोग्य तपासणी, शैक्षणिक योजनांबाबत जनजागृती आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभलेल्या या उपक्रमामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होईल, असे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
सर्वप्रथम सकाळी सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी आरोग्य केंद्र तपासणी , अंगणवाडी केंद्र, शाळा ,ग्रामपंचायत कार्यालय येथे भेटी देऊन आरोग्य आणि पशूधन यांचे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले सदरील कार्यक्रमास सरपंच निताताई बाळासाहेब देशमुख ,आणि जलनायक बाळासाहेब देशमुख तसेच खालील अधिकारी यांची उपस्थित होती. पशुधन विकास अधिकारी (विस्तार)श्रीमती डॉ .पेंडकर, डॅा.बंडेवार,वैद्यकीय अधिकारी डॅा गवई मॅडम ,डॅा.अंकुश गोवंदे,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती वैशाली आडगावकर , केंद्रप्रमुख बारड अरुण अतनुरे,विस्तार अधिकारी,विस्तार अधिकारी पंचायत श्री एस व्ही भाडेकर,विस्तार अधिकारी सांख्यिकी श्री दत्तात्रय उपलंचवार , मुख्याध्यापक चंपत मुनेश्वर सर,आणि APO मनरेगा अतुल पोकळे तसेच बचत गट CRP श्रीमती मिरकुटे ग्राम दरबार कार्यक्रमात आपल्या विभागातील योजनांची माहिती दिली .कार्यक्रम यशस्विते करिता ग्राम पंचायत अधिकारी प्रकाश कवठेकर यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .