शिष्यवृत्ती परीक्षेत वाघनख जिल्हा परिषद शाळा वरोरा तालुक्यातून अव्वल !

शालेयवृत्त सेवा
0

 



चंद्रपूर ( शालेय वृत्तसेवा ) :

वरोरा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघनख शाळेने नुकताच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल घोषित झाला यामध्ये वरोरा तालुक्यातील १ ते ७ वर्ग असलेल्या जि.प.उ.प्राथ. शाळा वाघनख येथील पूर्व माध्यमिक इयत्ता पाचवीचे ९ पैकी ५ विद्यार्थी कु. पल्लवी गजानन शेळके, कु. गुंजन रविंद्र मडकाम, कु. जानवी सुभाष सावरकर, कु. आदिश्री विजय भोयर, कु. अंकिता उमेश गुरनुले या पाच विद्यार्थिनी शिषवृत्तीस पात्र ठरल्या आहे.


         सदर निकाल हा वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून अव्वल असून पात्र विद्यार्थ्यांच्या अभिनंदन सोहळ्या प्रसंगी मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे तसेच वर्गशिक्षक संतोष धोटे यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे विषय शिक्षक नरहरी बन्सोड सर, सहायक शिक्षिका सौ. रेखा थुटे,कु.वैशाली गायकवाड यांचे कौतुक केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)