स्पेस एक्स च्या crew dragon या अवकाशयानाचे पायलट म्हणून कॅप्टन शुभांषु शुक्ला ISS वर..
रॉकेट उड्डाण होऊन त्यातून पृथ्वीबाहेर गेल्यावर रॉकेट पासून वेगळे झालेले यान सुरक्षितपणे स्पेस स्टेशन ला नेऊन जोडणे आणि परतीच्या प्रवासात स्पेस स्टेशन पासून वेगळे होऊन यान पृथ्वीच्या वातावरणात योग्य प्रकारे आणणे ज्यामुळे ते समुद्रात पॅराशूट च्या साहाय्याने उतरवता येऊ शकेल अशी कामे यानाचा कॉम्पुटर करत असतो.
विमानाच्या पायलट प्रमाणे अवकाशयानाचा पायलट चे ट्रेनिंग झालेले असले तरी अवकाश यानाच्या बाबतीत सर्व प्रक्रिया ही ऑटोमॅटिक कॉम्पुटर प्रोग्रॅम द्वारेच पार पाडली जाते.
केवळ इमर्जन्सी मध्ये यानाचा मॅन्युअल कंट्रोल घेणे किंवा यानाचे स्टेट्स मॉनिटरिंग करणे इतकेच पायलट चे काम असते.
त्यामुळे यान स्पेस स्टेशन ला जोडले गेल्यावर एक प्रकारे पायलट चे काम संपते.
तरी सुद्धा पायलट ला मोकळा वेळ असा मिळत नाही.
कारण स्पेस स्टेशन वर जाणाऱ्या प्रत्येकजण अंतराळवीरांच्या ट्रेनिंग वर लाखो डॉलर खर्च केलेला असतो, त्यामुळे मनुष्यबळ आणि कामाचे तास हे तिथे खूप मोलाचे असतात.
कॅप्टन शुभांषु शुक्ला गेले ती axiomspace या प्रायव्हेट कंपनीची मिशन आहे.
त्यामुळे यात ठरावीक कामे प्रत्येक अंतराळवीराची नेमून दिलेली आहेत.
या आधी तिथे जे ७ लोक आहे त्यांची सुद्धा ठरलेली कामे ते करत असतात त्यात मदत लागल्यास नव्या लोकांना मदत करण्यास सांगितले जाऊ शकते.
या शिवाय अवकाशयानाचे सर्व पॅरामीटर, पार्ट चेक करणे, रिपोर्ट करणे असे काम सुद्धा पायलट आणि कमांडर यांचे असते ज्यामुळे परतीच्या प्रवासा आधी कोणता प्रॉब्लेम मिळाल्यास तो योग्य वेळात सुधारू जाऊ शकेल.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर 14 दिवसाच्या मिशन मध्ये इसरो तर्फे कॅप्टन शुक्ला यांना पुढील कामे दिली गेली आहेत -
1] Crop seeds on ISS
सहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीच्या बियांचा अभ्यास ज्यात स्पेस मधील मायक्रोग्रॅव्हिटी मध्ये कशा प्रकारे या बिंयांच्या वाढीवर परिणाम करते यावर प्रयोग करणे आणि त्याचा डेटा गोळा करणे.
भविष्यात अति दूरच्या स्पेस मिशन मध्ये मानवाला अवकाशयानातच शेती करावी लागेल त्यानुसार असे प्रयोग महत्वाचे आहेत.
2] Cyanobacteria on ISS
सयानोबॅक्टेरिया जे प्रकाशसंस्लेशण क्रियेत महत्वाचे काम करतात त्यांचा स्पेस मधील मायक्रोग्रॅव्हिटी मध्ये अभ्यास करणे.
या प्रयोगातून अति दूरच्या प्रवासात कृत्रिम प्रकाश वापरून सुद्धा प्रकाशसंस्लेशण क्रिया कशी चालू राहू शकते यावर संशोधन केले जात आहे.
3] Myogenesis
स्पेस च्या मायक्रोग्रॅव्हिटी मध्ये राहिल्याने शरीरावर खास करून हाड, मांसपेशी यांच्यावर काय परिणाम होतात ते मोजणे.
भारतीय अंतराळयात्री ट्रेनींग साठी हा प्रयोग महत्वाचा आहे ज्यातून जमा केलेली माहिती भारताच्या अंतराळयात्रींना इसरो मध्येच ट्रेनिंग देण्यासाठी वापरली जाईल. सध्याचे भारतीय अंतराळयात्री युरोपिअन स्पेस एजन्सी मध्ये हे ट्रेनिंग घेतात.
4] STEMOstrations
Science, Technology, Engineering, and Mathematics (STEM) या विषयांच्या संदर्भातील प्रयोग आणि त्यांचे रिपोर्टींग
ह्यात काही वेळा स्पेस स्टेशन वरून थेट लाईव्ह व्हिडीओ द्वारे पृथ्वीवरील शालेय विद्यार्थ्याना संपर्क केला जातो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे अंतराळ यात्री देतात.
युट्युब वर याचे व्हिडीओ आहेत iss STEMOnstrations सर्च करून बघा.
5] Sprouts
पहिल्या प्रयोगा प्रमाणेच ह्यात सुद्धा विविध वनस्पती बिया आणि त्यांची स्पेस मधील कृत्रिम वातावरणात होणारी वाढ यावर हे प्रयोग असतात.
6] Space Microalage
वनस्पती प्रमाणेच शैवाल वर्गातील जीवांची स्पेस मध्ये कशा प्रकारे वाढ होते यावर हे प्रयोग आहेत.
7] Voyager displays
भविष्यात अति दूरच्या ताऱ्यावर मानवाला घेऊन जाणारी अवकाश याने व्हॉयेजर याना प्रमाणे अनेक वर्षे स्पेस मध्ये असणार त्यांच्यावर असणारे कॉम्पुटर स्क्रीन सतत मानवाला बघत राहावे लागणार आणि त्याच्यावर काम करावे लागणार अशा वेळी या कॉम्पुटर मॉनिटर डिसप्ले स्क्रिन दीर्घकाळ कशा टिकतील या बद्दल हे संशोधन आहे.
8] Voyager tardigrades
Tardigrade नावाचे सूक्ष्म जीव मोठ्या प्रमाणात रेडिएशन आणि स्पेस मध्ये मध्ये जिवंत राहू शकतात का त्यांच्यावर हे प्रयोग आहेत.
मानवाच्या शरीरात असणारे जनुक बदल करून दीर्घकालीन स्पेस मिशन साठी मानवी शरीराला नव्याने विकसित करण्याच्या दृष्टीने विशेष प्रकारच्या सूक्ष्मजीवांवर प्रयोग केले जातात आणि त्यांच्यातील जनुके भविष्यात मानवात ट्रान्सफर केले जाऊ शकतात का यावर हे संशोधन आहे.
--------------------
या व्यतिरिक्त आधी सांगितल्या प्रमाणे स्पेस स्टेशन आणि अवकाश यानाचा मेंटेनन्स, इतर लोकांना गरज पडल्यास कामात मदत अशी सुद्धा जबाबदरी कॅप्टन शुक्ला यांच्यावर आहेत.
जसे इसरो ने कॅप्टन शुक्ला याना वर सांगितलेली कामे नेमून दिली आहेत तशीच युरोपिअन स्पेस एजन्सी आणि नासा ने इतर ३ नवीन अंतराळवीरांना सुद्धा त्यांची कामे नेमून दिली आहेत. यावर सविस्तर माहिती कमेंट मधील लिंक वर वाचा.
-------------
@followers माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.
( सौजन्य : आकाशातील गमती जमती fb )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .