नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पीएमश्री मनपा शाळा वजीराबाद येथे 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमाची सुरुवात झाली. नांदेड मनपा शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या निर्देशानुसार शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी मुख्याध्यापक श्री परमेश्वर माहुरे व शिक्षक व विद्यार्थी पालक यांची उपस्थिती दिसून आली. शासनाच्या परिपत्रकानुसार हा उपक्रम जागतिक पर्यावरण दिन 5 जून पासून सुरू होत असून 30 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.
मनपा आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त नितीन गाढवे, शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड व त्याचे संगोपन करण्याचा शिक्षक पालक व विद्यार्थी यांनी संकल्प केला. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' या उक्तीप्रमाणे वृक्ष आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत व त्यापासून मिळणारे फायदे विद्यार्थी शिक्षक पालक यांना मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे यांनी सांगितले. तसेच येत्या काळात सुद्धा वृक्ष लागवड शालेय परिसरात केले जाणार आहे.
"इको क्लब फॉर मिशन लाईफ " उपक्रम मा. पंतप्रधान महोदयांनी देशभर राबविण्याचे आवाहन केले आहे. ' किती महत्त्वाचा आहे हे समजून येते, असे मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनात सांगितले. 'एक पेड मा के नाम' या उपक्रमाची शाळेत खूप उत्साहात सुरुवात झाली आहे. यावेळी सहशिक्षक केरबा मगरे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रकाश गजभारे, सेविका पूजा ताई गिरी उपस्थित होते.
'एक पेड मा के नाम' या आवाहनात आत्मीयता आहे. मातृप्रेम पर्यावरणाच्या रक्षणातून व्यक्त करण्याची संधी देणारा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची याबाबत जाणीवजागृती करून जास्तीत जास्त झाडे लावावीत.
-व्यंकटेश चौधरी, शिक्षणाधिकारी मनपा नांदेड
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .