जवळ्यात जागतिक लोकसंख्या दिन साजरा; लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी शिक्षकांची जनजागृती

शालेयवृत्त सेवा
0


 चिमुकल्यांच्या मानवी साखळीने वेधून घेतले लक्ष! 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

            जागतिक लोकसंख्या वाढीशी संबंधित आव्हाने आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि शाश्वत विकास यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधतो. जागतिक लोकसंख्या दिन आपल्याला प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, शिक्षण आणि पुनरुत्पादन आणि कौटुंबिक जीवनाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळावे याची खात्री करण्याची आपली सामूहिक जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी जवळा दे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, हैदर शेख, मनिषा गच्चे, संभाजी गवारे, इंदिरा पांचाळ आदिंची उपस्थिती होती. 


           आता जागतिक लोकसंख्या आठ अब्जांपेक्षा जास्त झाली आहे. तर उपलब्ध आकडेवारीनुसार, मागील  जनगणनेदरम्यान देशातील सुमारे १८ टक्के लोकसंख्या वाढली आहे. जर भारताची लोकसंख्या याच वेगाने वाढली असण्याची शक्यता आहे. येत्या दोन वर्षांत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. असे झाले तर देशात अन्न संकट, बेरोजगारीचे संकट, वैद्यकीय आणि आरोग्य संकट, जलसंकट मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल. स्थलांतर, उपासमार यामुळे लोक हतबल होतील. नैसर्गिक समतोल भंग केल्यास भयंकर नैसर्गिक आपत्तींचा धोका निर्माण होईल, अशी माहिती मुख्याध्यापक ढवळे यांनी दिली. 


          तरुणांना एका निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी सक्षम बनवणे गरजेचे आहे. जगातील सर्वात मोठ्या तरुण पिढीला त्यांना कधी, किती आणि किती मुले हवी आहेत याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार, साधने आणि संधी आहेत याची खात्री करणे, हीच यावर्षीची थीम असल्याचे बेंबडे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)