नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार आयोजित जिल्हास्तरीय मूल्यवर्धन ३.० चार दिवसीय प्रशिक्षणाला उद्घाटन डायटचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ च्या मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत असलेला सुधारित "मूल्यवर्धन ३.०" उपक्रम जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत राबवला जाणार आहे. मूल्यवर्धन ३.०’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असून त्यामुळे विद्यार्थी लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व सक्षम नागरिक बनतील. मूल्यवर्धन प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांमध्ये "संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याकरता मूल्यवर्धन प्रशिक्षणचा निश्चितच मदत होईल.
"मूल्यवर्धन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज होईल, ज्यामुळे संस्कारक्षम मुल्ये रुजवण्यात येतील. व्यावहारिक अनुप्रयोगात विद्यार्थी, समस्या सोडवण्याची मुल्ये, कौशल्ये विकसित करतील.असेही सांगितले. जिल्ह्यातील पहिली ते आठवीला शिकवणारे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक मराठी, इंग्रजी, हिंदी माध्यमाची शिक्षकांना प्रशिक्षण देण्याकरिता जिल्हास्तरावर प्रशिक्षणाचे पहिला टप्पा आयोजित करण्यात आला यावेळी उद्घाटन प्रसंगी मूल्यवर्धन प्रशिक्षणाचे स्वरूप, उद्देश, प्रास्ताविकात जिल्हा समन्वयक सुभाष वसावे यांनी आत्मविश्वास वाढवणारा नवीन कौशल्ये आणि ज्ञान मिळवल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांना कार्यबलासाठी तयार केले जाईल. करिअर प्रगती मूल्यवर्धन प्रशिक्षण नवीन करिअर संधी आणि प्रगतीचे दरवाजे उघडू शकते.
यावेळी जिल्हास्तर प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी तालुकास्तरावर तीन दिवसीय प्रशिक्षण सुलभक म्हणून काम करायचे आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे पहिल्या टप्प्यात ११५ व दुसऱ्या ११२ असे एकूण २२७ सुलभक प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. लवकरच तालुक्यातील सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल असेही सांगितले. उद्घाटनप्रसंगी वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, अधिव्याख्याता प्रदीप पाटील, अधिव्याख्याता विनोद लवांडे तसेच शांतीलाल मुथा फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयक उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत सुलभक गोपाल गावित, गोविंद वाडीले, तुषार पवार, गणेश भट, सचिन मानमोडे, शितल शिंदे यांनी केले. डायटचे अधिव्याखाता सुभाष वसावे यांनी सर्व एस. आर.जी व पुणे येथील शांतीलाल मुथा फाउंडेशन समन्वयक सूरज गोहेल यांच्यासोबत मिटिंग घेतली. सर्व प्रशिक्षणार्थी यांच्याकडून मूल्यवर्धन प्री ट्रेनिंग चाचणी सोडवून घेण्यात आली. तसेच उद्घाटन प्रसंगी सूत्रसंचालन सीमा पाटील यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .