"जिजामाता प्राथमिक शाळा मुगट तालुका मुदखेड जिल्हा नांदेड" या शाळेचा अभिनव उपक्रम. !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जवळ आलेले आहेत. निवडणूक म्हणजे काय? मोठी माणसे मतदान कसे करतात? ईव्हीएम मशीन कशी असते? मतमोजणी कशी करतात? शाई का लावतात? आणि एकूण प्रक्रिया कशी असते असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात. त्यावेळी शाळेतील सौ आर्यन भोसले मॅडम यांनी शालेय विद्यार्थ्यांना दोन गटात विभागत निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय सहकारी शिक्षकांना बोलून दाखवला, आणि ही प्रक्रिया सर्व शिक्षकांच्या, मुख्याध्यापकांच्या सहकार्याने शालेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदासाठी निवडणूक घेण्याची तयारी केली.
या पदासाठी एकूण 12 उमेदवार इच्छुक होते. त्यांचे एक दिवस फॉर्म दाखल करून घेण्यासाठी व त्यांना चिन्ह वाटप करण्यासाठी वेळ दिला एक दिवस प्रचार करण्यासाठी वेळ दिला . सौ के. आर. दरबस्तवार मॅडम यांनी वोटिंग मशीन अँप द्वारे ईव्हीएम तयार करत त्यात फोटो निशाणीसह उमेदवार यादी तयार करून घेतली. प्रत्यक्ष मतदान कसे करतात हे मॉक पोल दाखवून बॅलेट बटन दाबल्यानंतर पसंतीच्या उमेदवाराच्या पुढील बटन दाबल्यानंतर हिरवा लाईट लागतो आणि विशिष्ट आवाज होतो हे प्रोजेक्टर वरून सांगून प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू केली.
शाळेतील 114 विद्यार्थ्यांनी भाग घेतला विद्यार्थ्यातूनच निवडणूक अधिकारी व पोलीस बनवले विद्यार्थी खूप उत्सुकतेने यात सहभागी झाले एकूण 114 विद्यार्थ्यांचे मतदान संपल्यानंतर श्री एस. के. भोसले सर यांनी निकाल दाखविला यात कुमारी रितिका राजेश मुंगल ( इयत्ता सातवी) हिला 52 मते मिळाली आणि तिची शालेय मुख्यमंत्री म्हणून निवड जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर कुमारी समीक्षा सदाशिव कल्याणी हिची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली . निवडीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले व गुलाल लावून आनंद साजरा केला शेवटी निवड झालेल्या सर्व विद्यार्थीमित्राचे गुलाब पुष्प देऊन मुख्याध्यापक श्री जे एन देवठाणकर सर यांनी अभिनंदन केले.
निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामे कशी करायची शिक्षकांना मदत केव्हा करावी शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री भोसले सर यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आज मतदान मशीन कसे काम करते आणि मोठी माणसे मतदान कसे करतात हे शाळेतील सरांनी घेतलेल्या कार्यक्रमामुळे आम्हाला समजले आम्हाला मतदान करताना खूप मजा वाटली वेगळा अनुभव आम्हाला मिळाला असे कुमारी सृष्टी बालाजी गजले हिने सांगितले.
लहानपणापासून लोकशाहीचे धडे शाळेतच दिले तर विद्यार्थी जागरूक नागरिक तयार होतील मोबाईल इंटरनेटचा वापर करून आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा आम्हाला आनंद होत आहे असे मनोगत संस्थेचे सचिव श्री विलासराव कल्याणकर सर यांनी व्यक्त केले सौ. के. जी. हातागळे मॅडम सौ जे. व्हि.जोशी मॅडम यांनीही मोलाचे सहकार्य केले.




आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .