आदर्श केंद्रप्रमुख अरुण अतनुरे यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

शालेयवृत्त सेवा
0

 



विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा शेंबोली येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अध्यापक तथा केंद्र संकुल बारडचे केंद्रप्रमुख अरुण माधवराव पाटील अतनुरे यांना शेंबोली येथे सेवानिवृत्ती निमित्त सपत्निक भावपूर्ण निरोप देण्यात आला. महाराष्ट्राचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, महापालिकेचे माजी शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी सुधीर गुठे, सुरेश पाटील, नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंकर शिंदे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 


शेंबोली येथे अरुण अतनुरे यांना निरोप देण्यासाठी ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नीता बाळासाहेब देशमुख होत्या.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील मुलींनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर अरुण अतनुरे आणि सौ. शोभा अतनुरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी डॉ गोविंद नांदेडे, व्यंकटेश चौधरी, बाळासाहेब देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. अरुण अतनुरे यांनी आपल्या कार्यकाळात बारड संकुलासाठी भरीव योगदान दिले आहे अशा शब्दांत अरुण अतनुरे यांच्या कार्याचा गौरव केला. भक्ती गोरेवाड, गौरी गोरेवाड या शाळेतील विद्यार्थिनींनी हृद्य शब्दात मनोगत व्यक्त केले. अतनुरे यांनी शाळेतील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.


प्रास्ताविक सहशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांनी केले तर सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक दत्ता तोटावाड यांनी केले. यावेळी मुरलीधर शिंदे, संजय अतनुरे, लक्षुमन अतनुरे, ॲड.श्रीकांत अतनुरे, योग्यश्री शिंदे, ॲड. दीपाली शिंदे‌, कवी मनोहर बसवंते, शिक्षण विस्तार अधिकारी वि. रा. शिंदे, निवृत्त गटशिक्षणाधिकारी सुपे, शिवाजी भगनुरे, निवृत्त मुख्याध्यापक एल डी शिंदे, तुकाराम सूर्यवंशी, गोवंदे आदींची उपस्थिती होती.


सेवानिवृत्ती सोहळ्याच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक चंपत मुनेश्वर, सलाहुद्दीन मंगला महाजन, छाया मठदेवरु, सुनिता केंद्रे, संगीता वादळे, जयश्री गायकवाड, गोविंद गोरेवाड, शोभा गोरेवाड,अब्दुल हक्क यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)