नवापूर तालुक्यात हरणमाळ जिल्हा परिषद शाळेत "स्वच्छता ही सेवा" उपक्रमास प्रारंभ

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदूरबार / नवापूर ( शालेय वृत्तसेवा ) :

संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या "शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम" अंतर्गत "सर्वाना सोबत घेऊन चला" हा मूलभूत गाभा प्रत्यक्षात आणण्यासाठी नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्रांतर्गत हरणमाळ जिल्हा परिषद शाळेत "स्वच्छता ही सेवा" उपक्रमास सुरुवात ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावीत  यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमात महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, शिक्षक सतिलाल भामरे, हेमलता वळवी, कृष्णा गावीत, विद्यार्थी तसेच पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.


संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेली १७ शाश्वत विकास ध्येये व त्याअंतर्गत भारत सरकारने १ जानेवारी २०१६ पासून देशभर अंमलात आणली आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण करण्यासाठी "शाश्वत विकास नवरत्न" ही संकल्पना राबविली आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाचे विविध विभाग या माध्यमातून मार्गक्रमण करीत आहेत.


ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासात पंचायत राज संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली अंतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामार्फत बहुतांश योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. या योजनांद्वारे ग्रामीण जनतेच्या जीवनमानात सुधारणा, लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण करणे तसेच आरोग्य, शिक्षण, उपजीविका आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत सकारात्मक बदल घडविणे हे ध्येय आहे. असेही मनोगत गोपाल गावीत यांनी व्यक्त करण्यात आलेत.


शासनाने "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" राबविण्यास मान्यता दिली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहित करण्यासाठी सन २०२५-२६ पासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य या चार स्तरांवर पुरस्कार देण्यात येणार आहेत.


या अभियानाचे सात मुख्य घटक निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत (स्वनिधी, व लोकवर्गणीतून आर्थिक स्थैर्य), जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग आणि श्रमदानातून लोकचळवळ उभारणे या बाबींचा समावेश आहे. असेही ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावीत यांनी व्यक्‍त करण्यात आले आहेत. 


अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर असा निश्चित करण्यात आला आहेत. नवापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश चौरे, श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनीही मार्गदर्शन केले आहे. 


या माध्यमातून स्वच्छतेबरोबरच शाश्वत विकासाला गती मिळून ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीला नवे दिशा देण्यात येईल, विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत असा विश्वास मुख्याध्यापक काकुस्ते सरांनी व्यक्त करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)