नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. निंबा पाकळे यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या शालेय विकासातील महत्त्वावर प्रकाश टाकला. शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी समितीची भूमिका निर्णायक असून पालकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्री. पाकळे यांनी सांगितले की, समितीमार्फत शाळेच्या गरजांची ओळख पटवून त्यानुसार नियोजन केल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच शाळेच्या भौतिक सुविधा, पोषण आहार, स्वच्छता आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते. स्थानिक समाज, पालक आणि शिक्षक यांच्या सहभागातून समिती शाळेच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावते, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी श्रावणी गावाच्या मा.सरपंच सौ. मोनिका संदीप कोकणी, माजी सरपंच श्री. राजू कोकणी, माजी उपसरपंच श्री. सुरज कोकणी, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. रुपेश कोकणी, श्री. अरुण कोकणी, श्री. निलेश वळवी, श्री. भाईदास कोकणी, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. संदीप कोकणी, उपाध्यक्ष श्री. जोसेफ गावित, केंद्रीय मुख्याध्यापक श्री. महेंद्र नाईक तसेच शिक्षक अभिषेक कोकणी, राजेंद्र वसावे, मनीषा कोकणी, भारती सोनवणे, सुबोध वळवी, मालिनी वळवी, तेजस्विनी बिराडे, नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. गोपाल गावित, तसेच मोठ्या संख्येने पालक व माता उपस्थित होते.
श्रावणी शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन या कार्यक्रमात करण्यात आले. नव्याने निवडण्यात आलेले पदाधिकारी व सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. अध्यक्ष श्री. दिनेश दाव्या कोकणी, उपाध्यक्ष सौ. शारदा प्रल्हाद कोकणी, सदस्य श्री. गोपाल गंगाजी कोकणी, सदस्या सौ. अलका महेंद्र कोकणी, सदस्य : श्री. अरविंद मंगल कोकणी, सदस्य श्री. वंसा निलेश वळवी, सदस्य श्री. जोगेंद्र जयसिंग गावित, सदस्या सौ. सुनिता दिनेश भिल, सदस्य श्री. प्रकाश पंडीत कोकणी, सदस्य श्री. निलेश कातुड्या वळवी, शिक्षक प्रतिनिधी सौ. मनीषा गणेश कोकणी, सदस्य श्री. सचिदानंद रतीलाल कोकणी, सदस्या सौ. जयश्री गोरख कोकणी, सदस्या सौ. शर्मिला उमेश कोकणी, विद्यार्थी प्रतिनिधी वैभव प्रकाश कोकणी, विद्यार्थी प्रतिनिधी रुही राजू कोकणी, सचिव श्री. महेंद्र शाहू नाईक यांची निवड करण्यात आली. या पुनर्गठन कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री. महेंद्र नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक श्री. राजेंद्र वसावे यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .