महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मागणीला यश !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांची थकीत वेतन देयकाची १४ कोटी रक्कम शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे परत गेला. या प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याचे शिक्षक परिषदेची पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणी. परत गेलेला निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री अतुल सावे यांनी शिष्टमंडळाला दिले.
जिल्हा परिषद शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांची वेतन आयोग हफ्ते , चट्टोउपाध्याय वेतनश्रेणी, निवड श्रेणीचे थकीत वेतन देयकाची फरकाची रक्कम दरवर्षी शासनाकडून मागवण्यात येते व अशी रक्कम शासन जिल्हा परिषदकडे वर्ग केली जाते. व अशी आलेली सर्व देयके प्रलंबित न ठेवता संबंधित शिक्षकांना त्यांना अदा करण्याचे शासनाचे आदेश असतानाही व शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असतानाही. गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित देयके जि प प्रशासनाच्या दिरंगाई मुळे व हलगर्जीपणामुळे 31 मार्च रोजी संबंधित शिक्षकांना न मिळाल्यामुळे ३१ मार्च नंतर १४कोटीची रक्कम परत गेल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शिक्षक या लाभापासून वंचित राहिले आहेत.आता ही निधी परत उपलब्ध होण्यासाठी एक वर्ष लागतो. यामुळे ज्या शिक्षकांची देयके प्रलंबित होती ते शिक्षक आता मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
यामुळे शासनाने निधी उपलब्ध करून देऊनही दप्तर दिरंगाई व जि प प्रशासनाकडून हलगर्जीपणा करण्यात आला. यामुळे पात्र असूनही शिक्षकांना त्यांची देयके मिळाली नाहीत. अशा दोषी कर्मचारी व अधिकाऱ्याची खाते निहाय चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी. आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.पालकमंत्री अतुल सावे यांनी या संदर्भात तात्काळ कारवाई करण्यात येईल व परत गेलेला निधी उपलब्ध करून देणार असे आश्वासन शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.
याप्रसंगी किनवट विधानसभाआमदार संघाचे आमदार भीमराव केराम , जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त महेश डोईफोडे उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिकचे विभागीय कार्याध्यक्ष बालाजी बामणे, जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड ,जिल्हा कार्यवाह प्रल्हाद राठोड, जिल्हा प्रवक्ते रवी ढगे,जिल्हा संघटन मंत्री संजय मोरे, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिथुन मंडलेवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल मुखेडकर उपस्थित होते.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .