शिक्षकांच्या राज्यस्तरीय कराओके गीतगायन स्पर्धेत मुन्ना थोरात प्रथम तर मिलिंद कंधारे तृतीय....!

शालेयवृत्त सेवा
0

 



राज्याध्यक्ष नटराज मोरे सरांच्या सेवापूर्ती निमित्त अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रिडा मंडळाचा उपक्रम !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

            अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रिडा मंडळ महाराष्ट्र राज्य आयोजित शिक्षकांच्या राज्यस्तरीय कराओके गीतगायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा कल्याण मुंबई येथे २ मे रोजी पडला. यास्पर्धेत पूर्ण राज्यातून जवळपास आठरा अंतीम विजेते गायक विभागीय स्तरांतून निवडले गेले व त्यातून महाअंतिम चूरस झाली. यात मराठवाडा विभागातून महाराष्ट्राचा महागायक बनण्याचा मान माहूर तालुक्यातिल पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल वाईबाजार येथील शिक्षक मुन्नेश्वर थोरात यांना मिळाला आणि ते प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले. याच महाअंतिम सोहळ्यात याच शाळेतील मिलिंद कंधारे हे तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. अचिव्हर काॅलेज, जोशी बाग,कल्याण या ठिकाणी हा राज्यस्तरीय शिक्षक कराओके महाअंतिम सोहळा संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रिडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नटराज मोरे यांच्या नियत वयोमानानुसार निवृत्ती झाल्यामुळे सेवापूर्ती सोहळा सुद्धा संयुक्त रित्या याच ठिकाणी संपन्न झाला.


           महाराष्ट्र राज्यातून विभाग स्तरांतून प्रत्येकी तीन असे अंतीम आठरा स्पर्धक या महाअंतिम सोहळ्यास उपस्थित होते. त्यात मराठवाडा विभाग अग्रेसर ठरला. प्रथम मुन्नेश्वर थोरात व तृतीय  मिलिंद कंधारे असे दोन पुरस्कार घेत मराठवाडा विभागाने आपली या स्पर्धेत छाप सोडली. यावेळी अध्यक्षस्थानी अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा निरोपमुर्ती नटराज मोरे हे होते. तसेच मराठवाडा विभागीय सचिव शेषराव पाटील, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध चित्रकार रणजीत वर्मा, राज्य सचिव सौ.हर्षल साबळे, कोकण विभाग प्रमुख सौ.विद्या शिर्के हे उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिध्द संगीत दिग्दर्शक श्याम क्षीरसागर हे होते. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन प्रसिध्द निवेदिका डॉ. विद्या शिर्के यांनी केले तर आभार राज्य प्रसिद्धीप्रमुख सचिन कुसनाळे यांनी मानले. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


                मुन्ना थोरात व मिलिंद कंधारे यांच्या या यशामुळे माहूरचे नाव परत एकदा गौरविले आहे असे गौरवोद्गार मराठवाडा विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी काढले. विजेत्यांचे शिक्षणाधिकारी योजना नांदेड दिलीप  बनसोडे,गटशिक्षण अधिकारी माहूर  संतोष शेटकार,विस्तार अधिकारी संग्राम कांबळे,पी.एम.श्री.जि.प.हायस्कूल वाईचे मुख्याध्यापक अजय राठोड,शा.व्य.समिती अध्यक्ष अमजद खान पठाण,निवेदक उत्तम कानिंदे,अनिलकुमार महामूने शा.पो.आ.अधिक्षक किनवट,नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव,रुपेश मुनेश्वर पत्रकार साजीद खान पठाण,अजयकुमार कंधारे,डाॅ.अरुण धकाते,रुपेश मोरे यांनी अभिनंदन केले असून विजेत्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)