मोरे सरांच्या सेवापूर्ती निमित्त घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या कराओके गीत गायनात महाराष्ट्राचा महागायक ठरले मुन्ना थोरात !
मुंबई / कल्याण ( शालेय वृत्तसेवा ) :
अखिल भारतीय शिक्षक साहित्य-कला-क्रीडा मंडळाचे संस्थापक राज्याध्यक्ष श्री. नटराज मोरे यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित शिक्षकांच्या "कौन बनेगा महागायक" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मराठवाडा विभागाच्या मुन्ना थोरात यांनी बाजी मारली. सर्व मान्यवर व उपस्थितांनी सरांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मोरे सरांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेत "दादासाहेब" उपाधीने गौरवण्यात आले.
स्पर्धेसाठी राज्यातून नागपूर, मराठवाडा, कोकण, नाशिक, पुणे, अमरावती या सहा विभागातील विजेत्यांनी स्पर्धेत सहभाग घेत आपल्या विभागाचे नेतृत्व केले. अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल झोपे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अॕचिव्हर्स कॉलेजचे प्राचार्य श्री.महेंद्र भिवंडीकर, आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार श्री. रणजीत वर्मा, फिल्मी जगतात आपल्या संगीताची छाप सोडणातरे संगीत दिग्दर्शक श्री. शाम क्षिरसागर, नाट्य व टि.व्ही सिरियल अभिनेत्री श्रीमती स्नेहा केसरकर, निवृत्त विस्तार अधिकारी श्री.अनंता सुरोसे, केंद्रप्रमुख संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. शाम दोंदे, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विजय जाधव, नाट्य व शॉर्ट फिल्म निर्माते अभिनेते श्री. अजय पाटील, पतपेढी संचालक श्री. प्रशांत घाघस, टि.व्ही सिरियल अभिनेते व गायक श्री. विजय पाटील, श्री. अंकुश ठाकरे, बोधी नाट्य परिषदेचे सचिव श्री. राज बाळदकर, राज्य कोषाध्यक्ष श्री. धनराज चव्हाण, राज्य सचिव सौ. हर्षल साबळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री. सचिन कुसनाळे, दिव्यांग सेना अध्यक्ष श्री. रविंद्र तरे, मराठवाडा विभागीय सचिव श्री. शेषराव पाटील, कोकण विभागीय अध्यक्षा सौ. विद्या शिर्के बाळदकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. कैलासनाथ पाटील यांच्यासह मराठवाडा, नाशिक, कोकण नागपूर विभागातील विजेते गायक स्पर्धक आपापल्या विभागाचे नेतृत्व करण्यासाठी उपस्थित होते.
श्री. नटराज मोरे यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने अखिल भारतीय शिक्षक साहित्य- कला-क्रीडा मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्या यात मराठवाडा विभागाचे श्री. मुन्ना थोरात यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक कोकण विभागाचे श्री. प्रकाश धानके तर तृतीय क्रमांक नाशिक विभागाचे श्री. संतोष मिरघे आणि मराठवाडा विभागाचे मिलिंद कंधारे यांनी पटकावला सर्वोत्कृष्ट विजेता श्री. रविंद्र तरे ठरले तर उत्तेजनार्थ नागपूर विभाचे विकास पुरेल्लीवार यांनी पटकावला. सर्वोत्कृष्ट कोकण विभाग ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदिका विद्याताई शिर्के-बाळदकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. कार्यक्रमाचे नियोजन राज्य सचिव सौ. हर्षल साबळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण अखिल भारतीय शिक्षक साहित्य- कला-क्रीडा मंडळ परिवारातर्फे करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्यसचिव सौ हर्षल संजय साबळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री सचिन कुसनाळे, राज्य तंत्रनिर्देशक श्री अलंकार वारघडे, कोकण विभाग प्रमुख श्रीमती विद्या शिर्के बालदकर, नागपूर विभाग प्रमुख श्री.नरेंद्र कन्नके, पुणे विभाग प्रमुख श्री.तानाजी आसबे, नासिक विभाग प्रमुख सौ सुनीता येवले, अमरावती विभाग प्रमुख श्री बाबाराव डोईजड, मराठवाडा विभाग प्रमुख श्री रमेश मुनेश्वर अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळचे पदाधिकारी परिश्रम घेतले.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .