राज्यातील ८८ विद्यार्थ्यांना बालदिनी ‘बालरंग गौरव पुरस्कार’ जाहीर

शालेयवृत्त सेवा
0





नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षकांचे व्यासपीठ शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘बालरंग गौरव पुरस्कार २०२६’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. 

राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.  अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी); ब गट (इयत्ता सहावी ते दहावी); क गट (इयत्ता अकरावी ते पदवी) अ, ब आणि क गटातील एकूण ८८ उत्कृष्ठ बाल चित्रकारांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांमध्ये सन्मानचिन्ह आणि प्रिंट सन्मानपत्र यांचा समावेश आहे. 


विजेत्यांमध्ये अ गटात गुंजन गजबे, अमरावती; पुजा ढोमणे, अमरावती; देवांशी शिरभाते, अमरावती; प्रनंद पाटील, नंदुरबार; तनुष दौंडकर, पुणे; अर्णवी गंजीवाले, अमरावती; सत्मिका धनावडे, मुंबई; राघव फडतरे, सातारा; लक्ष्मी अलुरे, धाराशिव; हर्षद राठोड, धाराशिव; योगिता चव्हाण, धाराशिव; प्राजक्ता चव्हाण, धाराशिव; तनुल परमार, मुंबई; तितिक्षा परमार, मुंबई; कनिष्क मयेकर, सिंधुदुर्ग; प्रचिती गायकर, पालघर; दिव्या धार्मिक, अमरावती; रौनक गौरखेडे, अमरावती; स्वराज कत्ते, धाराशिव; गणेश घंटे, धाराशिव; सौरव धनके, धाराशिव; निशांत बनसोडे, धाराशिव; प्रेमीला मारेकर, धाराशिव; गणेश गुड्डे, धाराशिव; रणवीर चव्हाण, धाराशिव; विश्वजीत शिंदे, धाराशिव; आराध्या राठोड, धाराशिव; निर्मलकुमार गब्बुरे, धाराशिव; बाबुराव डाळिंबे, धाराशिव; गायत्री पाटील, धाराशिव; जियाद मकानदार, धाराशिव; सावली मोरे, धाराशिव; सपना सचिन राठोड, धाराशिव; धनश्री बिडकर, अमरावती; वैष्णवी हेडाऊ, अमरावती;

खुशी धार्मिक, अमरावती; शिवम घंटे, धाराशिव; सुमित घोडके, धाराशिव; रुद्र राठोड, धाराशिव; सोमनाथ पवार, धाराशिव; हार्दिक कोल्हे, नागपूर; रुचिका मंगरघाये, अमरावती; प्रियल डोंगरे, अमरावती; रिद्धी पराते, अमरावती; गौरी येवले, अमरावती; रागिणी नांदणे, अमरावती; समीक्षा पाटील, धाराशिव; श्रावस्ती पाटील, अमरावती; प्रसाद ठोंबरे, मुंबई; प्रगती मोरे, अमरावती; प्रियांशू चव्हाण, नाशिक; स्टीवन भालेराव, सोलापूर; हर्षिका माहोरे, अमरावती; जिग्नेश पांचाळ, नवी मुंबई; आर्वी म्हात्रे, नवी मुंबई; मरियम कुटवाडे, सांगली; जय गोरवे, सोलापूर आणि ब गट श्रावणी खासबागे, अमरावती; भाविका खासबागे, अमरावती; आरती बोडखे, अहिल्यानगर; कृष्णा चव्हाण, धाराशिव; निशा उर्ईके, अमरावती; अमित चव्हाण, धाराशिव; काव्या जामघरे, रायगड; रोली बिडकर, अमरावती; नागराज तळणे, धाराशिव; रोहित पवार, धाराशिव; स्वराली वानखेडे, अमरावती; तन्वी बगाडे, अमरावती; भक्ती पवार, धाराशिव; संकेश्री लोहार, सातारा; सुयोग भोसले, सातारा; अनिरुद्ध सुतार, अहिल्यानगर; सिया वाघ, सिंधुदुर्ग; नुरीया सय्यद, नाशिक; प्रांजल पाटील, नंदुरबार; साहिल दहिबावकर, मुंबई; वेदांत दुंडगेकर, सातारा; हर्षल राऊळ, सिंधुदुर्ग; आदर्श बनसोडे, सांगली; तीर्था मुळे, मुंबई; कृत्तिका कोकोडे, अमरावती तसेच क गटात प्रिया देसाई, सिंधुदुर्ग; अर्पित पैठणकर, पुणे; समर्थ वास्कर, कोल्हापूर; समृध्दी सोनवणे, नाशिक; महेक मुलाणी, सातारा; श्रेयश भसारकर, गडचिरोली यांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे. 


या स्पर्धेसाठी श्री. देविदास शिवराम हिरे, कला शिक्षक, 'शिक्षण मंडळ भगूर' संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड, जि. नाशिक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांचे मधुकर घायदार, डी. जी. पाटील, प्रभाकर कोळसे, यशवंत गडवार, कलावती पवार, मीना सोनकुसळे, संगीता पवार, कलशेट्टी मल्लिकार्जुन शिवलिंग, स्वाती वानखेडे, डॉ. इस्माईल पठाण आणि संपूर्ण संपादकीय मंडळ तसेच शिक्षक ध्येय परिवाराने अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)