नांदेड (शालेय वृत्तसेवा ) :
धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत मुख्याध्यापक मारोती कागेरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करून 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. तत्पूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती मीना रवी वावळे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष लक्ष्मण पांचाळ, सदस्य सौ. लक्ष्मीबाई उत्तम आंबेवार, पत्रकार भगवान कांबळे यांनी देखील प्रतिमेचे पूजन केले.
तत्पूर्वी विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी भारतीय राज्यघटना म्हणजे संविधानाचे सामूहिक वाचन केले. याप्रसंगी तेजस्विनी वाघमारे आणि सुशील सोनकांबळे यांनी भाषण केले. याप्रसंगी विषय शिक्षक नासा येवतीकर, सौ. मनीषा जोशी, सौ. चंदा हमीदसाब सय्यद, श्रीमती सुमित्रा खेडकर, एजाज अहमद सय्यद, माधव हिमगिरे आणि गणेश सिरमेवार यांची उपस्थिती होती. उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .