सांगली ( अजय काळे ):
भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत शब्द साहित्य विचारमंच सांगली यांच्यावतीने कर्नाळ ता. मिरज येथील श्री.भारत चिंतामणी बंडगर यांनी संपादित केलेल्या 'उन्मेष सर्जनतेचा' या जिल्हा व राज्य स्पर्धेतील नाविन्यपूर्ण उपक्रम या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन श्री.दयासागर बन्ने व श्री.गौतम कांबळे यांच्या हस्ते झाले.
जिल्हा परिषद शाळा कर्नाळ ता. मिरज येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी,श्री दयासागर बन्ने होते. या पुस्तकातील लेखक श्री.नंदकिशोर पाटील (दहिवडी) श्री.अजय काळे (दहिवडी) श्री.नामदेव पाटील (सांगली) सौ.रूपाली पाटील (कवलापूर) श्रीम.वासंती खेराडकर (शिरगाव-क) श्रीम.छाया कुंभार (वासंबे) सौ.सुषमा देशमाने (सुखवाडी) सौ.शर्मिष्ठा अंबवडे - पाटील (जागृती डीएड कॉलेज तासगाव) श्री.भारत बंडगर (कर्नाळ) यांच्या नवोपक्रमाचा समावेश पुस्तकात करण्यात आला.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी बोलताना कवी श्री. दयासागर बन्ने यांनी शिक्षकांनी केलेले नवोपक्रम अभ्यासपूर्ण असून ते ग्रंथ स्वरूपात एकत्रित केल्यामुळे इतरांनाही त्याचा चांगला उपयोग होईल. ते फक्त पुस्तकात न राहता या उपक्रमांचा कार्यशाळा घेऊन प्रत्यक्ष वापरही करावा, असे सांगितले. श्री गौतम कांबळे यांनी असे उपक्रम शिक्षकांनी कराववेतच शिवाय सर्जनशीलतेकडून त्यांनी आता सृजनशील काव्य, कथा, कादंबरी निर्मिती करावी असे सुचित केले.
या कार्यक्रमाला तेजश्री प्रकाशनचे दादासाहेब जगदाळे, श्री.मुबारक उमराणी (सांगली) विवेकानंद स्कुलच्या श्रीम. रूपाली कुंभार, जिल्हा परिषद शाळा कर्नाळच्या मुख्याध्यापक श्रीम.कलावती माने, ट्रेकिंग ग्रुपचे श्री.सुनील पाटील (मेजर) श्री.कुमार पुजारी, श्री.प्रकाश जाधव, श्री.बलराज कदम, श्री.रामचंद्र देशमाने, सौ.सुधा पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन लिहित्या हातांना बळ देणाऱ्या शब्दसाहित्य विचारमंच, सांगली यांच्यावतीने कथाकार सचिन वसंत पाटील, श्री.महादेव माने सुधीर कदम, कवी अभिजीत पाटील, रमजान मुल्ला यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती वासंती खेराडकर व आभार श्री.रामचंद्र देशमाने यांनी मानले.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .