इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित ठेवू नये व पालकांना फी वसुलीसाठी सक्ती करू नये.. - शालेय शिक्षणमंत्री मा. ना. प्रा. वर्षाताई गायकवाड

शालेयवृत्त सेवा
0

 




हिंगोली ( शालेय वृत्तसेवा ) :

इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनानी कोरोना सारख्या असाधारण महामारी प्रसंगी मानवीय दृष्टीकोन ठेवून पालकांना फीमधून भरघोस सुट दयावी अन्यथा राज्यभरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या असंख्य तक्रारी बाबत विद्यार्थ्यांचे शिक्षण व पालकांच्या हक्काच्या रक्षणासाठी महाराष्ट्र शासन कठोर पावले उचलेल. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित ठेवू नये व पालकांना फी वसुलीसाठी सक्ती करू नये असे शालेय शिक्षणमंत्री मा. ना. प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी पालकांच्या शिष्टमंडळास सांगितले.

 

जागतिक कोरोना महामारीमुळे मागील वर्षभरापासुन सर्वच शाळा बंद आहेत. शाळांत केवळ ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. कोरोनामुळे अनेक पालकांचे रोजगार गेले तर बहुतांश पालकांच्या उत्पन्नात कमालीची घट झालेली असतानाही नांदेड जिल्हयासह राज्यभरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा पालकांना संपूर्ण वर्षाची नियमित फिस भरण्यासाठी तगादा लावत आहेत. फिस न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेमार्फत परिक्षांचे निकाल व ऑनलाईन क्लासची लिंक दिली जात नाही. यासाठी शासन पातळीवर पालकांना दिलासा देण्यात यावा. यासाठी इंग्रजी माध्यमांच्या विविध शाळांत शिकणाऱ्या नांदेड येथील पालकांचे एक शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचा शालेय शिक्षणमंत्री व हिंगोली जिल्हयाच्या पालकमंत्री मा.ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांची शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे भेट घेवून शिक्षणमंत्र्यासमोर सविस्तर म्हणणे मांडले.

            

या प्रसंगी शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षाताई गायकवाड यांनी पालकांचे सविस्तर म्हणणे ऐकून घेतले. शिक्षण मंत्र्यांनी चर्चा करताना सांगितले की, इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या फी वसुलीबाबत राज्यभरातून असंख्य तक्रारी येत आहेत. शासन या विषयावर गांभिर्यपूर्वक विचार करतच आहे. इंग्रजी माध्यमांच्या काय कोणत्याच शाळांना विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित ठेवता येणार नाही. तसेच पालकांच्या मागे फी वसुलीसाठी तगादाही लावू नये. कोरोनामुळे प्रत्यक्ष  शाळा बंद असल्यामुळे शाळांचा व्यवस्थापनावरचा बहुतांश खर्चही कमी झालेला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी कोरोना सारख्या असाधारण महामारी प्रसंगी मानवीय दृष्टीकोन ठेवून पालकांना फीमधून सुट दयावी अन्यथा राज्यभरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या असंख्य तक्रारी बाबत विद्यार्थ्यांचे शिक्षण व पालकांच्या हक्काच्या रक्षणासाठी न्यायालय प्रक्रीयेच्या अधिन राहून महाराष्ट्र शासन कठोर प्रशासकीय कारवाईचे पावले उचलेल, असे स्पष्ट आश्वासन  शालेय शिक्षणमंत्री व हिंगोलीच्या पालकमंत्री मा.ना.वर्षाताई गायकवाड यांनी पालकांच्या शिष्टमंडळाला दिले.

                

सदरील शिष्टमंडळात इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा)चे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष मा.बालासाहेब लोणे, मा.निलेश गोधने, फुलवळकर, मा.बबनराव घोडगे, मा.अनिल कदम, मा.सुमित वंडकार, मा.सोनल उके, मा.रमेशराव गोवंदे, मा.मिलिंद जाधव, मा.रामदास गोणारकर, मा.दत्ता ढवळे, कैलास पोहरे मा.नागनाथ येरमलवाड, मा.पंचकिण कंधारे मा.माधव कांबळे, मा.दत्ता ढवळे,मा.दत्ता ढवळे, मा.लोकेश पाईकराव, मा.साहेबराव कांबळे मा.जितेंद्र गवळे, मा.अशोक पंडीत, मा, मा.माधव अंभोरे, मा.अशोक गायकवाड, मा.राम अनंतवार, मा.जगन्नाथ वाघमारे अन्य मान्यवरांचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)