नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सूर्योदया सायन्स फाऊंडेशन पुणे यांच्याकडून जि. प. प्रा शाळा पार्डी येथील आर्थिकदृष्टया वंचित घटकातील मुलांना स्कूल बॅग, वह्या, पेन, कम्पासपेटी,कलरबाॅक्स इ. साहित्याचे वाटप करण्यात आले.
सूर्योदया सायन्स फाऊन्डेशन ही एक सेवाभावी संस्था असून ग्रामीण भागातील वंचितासाठी शिक्षण व आरोग्य सेवा सुधारण्यासाठी समर्पित आहे. सदरील संस्था वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करत असून सायन्स क्लाउड या कार्यक्रमाच्या उद्दिष्टानुसार पार्डी शाळेतील गरीब व होतकरू मुलांना स्कूल बॅग व शालेय साहित्य वाटप केले.
यामध्ये शिरीन शेख, पुनम कांबळे, नारायण गायकवाड अश्विनी भिसे, किर्ती भोजने दिव्या सूर्यवंशी ,समर्थ शिंदे, अर्पिता कांबळे, जया गायकवाड अशा अनेकमुलामुलींना साहित्य प्राप्त झाले यामुळे मुलांच्या चेह-यावर जो आनंद निर्माण झाला आहे तो अमूल्य आहे. साहित्य वाटप प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बंधु उपस्थित होते. याचबरोबर शाळेतील मुख्याध्यापक श्रीमती कांता गांजुरे सहशिक्षक श्री रमेश पावडे ,योगाजी कल्याणकर, श्रीमती शोभा देशमुख, श्रीमती मंगला सलामे उपस्थित होत्या.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उषा नळगिरे यांनी केले.सायन्स फाउन्डेशनचे संस्थापक श्री नरेंद्र ढेले यांचे व साहित्य पोहचवण्यासाठी मेहनत घेतलेल्या श्रीमती निरामय मॅडमचे कौतुक केले. मुलांना केलेली मदत शैक्षणिक प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असेल असे गौरवोध्दार ग्रामस्थांनी केले. श्री नामदेव भोसले यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले व शैक्षणिक दृष्टया सक्षमीकरणासाठी सूर्योदया सायन्स फाऊंडेशनचे कार्य उल्लेखनीय आहे असे मत व्यक्त केले आणि सूर्योदया सायन्स फाउन्डेशनच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आणि खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .