मुख्यकार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर घूगे यांच्या आव्हानास प्रतिसाद ..
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
मारतळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथे गेल्या दोन वर्षांपासून उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांच्या कल्पकतेने विध्यार्थी यांच्या मदतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित येत आहेत नुकताच जागतिक वन्यजीव दिवस निमित्ताने जिल्हा परिषदेच्या परीसरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर घुगे यांच्या पुढाकाराने पक्षानं साठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे त्यामुळे पक्षांना अन्न पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भटकंती करावी लागते त्यांची सोय होण्यासाठी सर्वांनी आपल्या घराच्या छतावर पाणी ठेवावे व सर्व कार्यालयात सुध्दा पक्षांना पाण्याची सोय अशी व्यवस्था करण्याचे आव्हान केले त्यास प्रतिसाद म्हणून जिल्हा परिषदेच्या वर्ग 5 वीच्या मुलांनी उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांच्या मदतीने रिकाम्या तेलाच्या पिप्याचा वापर करून शाळेच्या परिसरातील झाडांना त्यात पक्षांना पाणी व अन्न (तांदूळ व दाने )याची सोय करून ठेवण्यात आले यामुळे पक्षांची चांगली सोय होत असून परिसरातील लोकांनी मुलांच्या या उपक्रमाचे उपक्रम राबविणाऱ्या रवी ढगे व सहभागी विद्यार्थी यांचे कौतुक करत आहेत तसेच लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र सोनटक्के ,विस्तार अधिकारी श्री कृष्ण कुमार फटाले,केंद्र प्रमुख श्री टी पी पाटील यांनी सुध्दा कौतुक केले आहे सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपक्रमशील शिक्षक रवी ढगे, बालाजी प्यारलवार, वर्ग 5 वीचे सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .