नाशिक जिल्हा परिषदेत जागतिक महिला दिन साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 



नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :

 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रमशिल कर्तृत्ववान महिला म्हणून नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी (माध्य.) मा . डॉ . वैशाली झनकर (वीर ) यांचा जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षणाधिकारी म्हणून विविध संघटनांच्या तर्फे पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून त्यांच्या कामाला शुभेच्छा दिल्या.


 या वेळी उपशिक्षणाधिकारी श्री . अनिल शहारे साहेब '      कक्षअधिक्षक श्री . सुधीर पगार साहेब, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री एस बी देशमुख सर यांनी आपल्या मनोगतातून जिल्हा  परिषदेचे  विभागाचे कामकाज अतिशय  गतिमान असून उपशिक्षणाधिकारी कक्ष अधिकारी लिपिक  यांनीसुद्धा जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी तत्पर व कटिबद्ध असले पाहिजे असे   मत व्यक्त केले.


 यावेळी  नाशिक जिल्हा शिक्षक परिषदेचे डी . यू . आहिरे मुख्याध्यापक  संघाचे पी . के . धुळे , श्री . जनार्दन आहिरे ,दिव्यांग संघटनेचे प्रमुख बाळासाहेब . सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये डी यु आहिरे, पी. के . धुळे, जनार्दन आहिरे , बाळासाहेब सोनवणे ,      चंद्रकांत शेलार . बी . टी .शेळके साहेब , बाळासाहेब     आव्हाड , राहुल मोराणकर, खैरनार  सर, उपशिक्षणाधिकारी बागुल साहेब ,पी . यु . पिंगळकर मॅडम ,आहेर मॅडम, भोई साहेब सेवक महिला ठाकूर मॅडम, वाघ मॅडम, पाटील मॅडम हे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)