*हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या शिष्टमंडळाने घेतली
औरंगाबाद- हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या शिष्टमंडळाने घेतली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ औरंगाबाद विभागीय सचिव श्रीमती सुगता पुन्ने मॅम यांची आज त्यांच्या कार्यालयात भेट घेतली व माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एप्रिल/मे 2021 संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व परीक्षा मध्ये मुस्लिम समाजातील मुस्लिम परीक्षार्थी विद्यार्थिनींना बुरखा/ स्कार्फ घालून परीक्षा देण्याची अनुमति देणे व परीक्षा हॉल व परीक्षा केंद्रात प्रवेश करतांना महिला पोलीस अधिकारी/ शिक्षिका तर्फे सर्व पळताडणी करण्यात यावी यात काही ही अडचणी नाही.
तसेच उच्च माध्यमीक प्रमाणपत्र परिक्षा एप्रिल /मे २०२१ ची परीक्षा मुस्लिम सण रमजान या महिन्यात येत असल्यामुळे परीक्षेचे काही पेपर हे दुपारी 3:00 ते सायं 6:30 वाजेपर्यंत आहे. सदर पेपर च्या वेळेस शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना उपास सोडण्याची वेळ असल्याकारणाने सदर वेळेत कृपया बदल करण्यात यावे ही नम्र विनंती. सदरील पेपर सकाळ च्या सत्रात किंवा मागे पुढे केलेस ही अडचण दूर करण्यास आपल्या कार्यालयातुन पाठपुरावा व्हावे ही विनंती करण्यात आली. यावेळी औरंगाबाद विभागीय सचिव श्रीमती सुगता पुन्ने मॅम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व आम्ही आज किंवा उद्याच राज्य मंडळ कार्यालयकळे आपले निवेदन पाठविण्यात येईल व मार्गदर्शन घेण्यात येईल व आपल्या मागण्या मार्गी काढण्यात येईल. या वेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे सर्वोसर्वा व मेयार अससोसिएशन चे विभागीय अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, शफीक पठाण सर, सय्यद अब्दुल रहीम सर, शेख यासेर , डॉ. सोहेल नवाब, सय्यद ताजीम, मोहसीन खान आदींची उपस्थिती होती.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .