उपक्रमशिल शिक्षिका उषा नळगिरे यांना चॅलेंजर आॅफ चॅम्प पुरस्काराने केले सन्मानीत. .

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

 महाराष्ट्रातील रणरागिनी बालरक्षक भगिनींचा दि 8.03.2021 रोजी अविस्मरणीय व प्रचंड प्रेरणादायी सन्मान सोहळा बालरक्षक महाराष्ट्र फेसबुक पेजवर लाईव्ह स्वरूपात पार पडला.यामध्ये नांदेड जिल्हयातील जि. प. प्रा शाळा पार्डी येथे कार्यरत असलेल्या सौ उषा नळगिरे यांना बालरक्षक चळवळीतील सक्रीय सहभागाबद्दल चॅलेंजर आॅफ चॅम्प पुरस्कार प्राप्त झाला. नांदेड जिल्हयातील एकमेव शिक्षिका उषा नळगिरे यांची निवड झाली ही जिल्हयासाठी अभिमानाची बाब आहे. या खास सन्मान सोहळ्यासाठी राज्याचे शिक्षण संचालक माननीय दिनकर टेमकर साहेब, समता विभागाच्या उपसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे मॅडम, पुणे डाएटच्या प्राचार्या शोभाताई खंदारे मॅडम यांची खास उपस्थिती होती.


याप्रसंगी वरील मान्यवरांनी सर्व सन्मानमूर्ती महिलांचे विशेष अभिनंदन केले.राज्यभरातील वेगवेगळ्या भागात उत्कृष्टपणे कार्य करणाऱ्या संवेदनशील बालरक्षक महिलांना.. चॅलेंजर ऑफ चॅम्प या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व भगिनींचे मनापासून अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन दिपाली सबसगी उस्मानाबाद, योगिनी मॅडम रायगड, वैशाली ताई काकडे मुंबई, रूपाली अंतरकर औरंगाबाद व व सर्व महिला टीमचा वतीने कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन नियोजन करण्यात आले होते.हा सन्मान सोहळा, कौतुकसोहळा, केलेल्या कार्याचा यथार्थ गौरव सोहळा उच्चस्तरीय मान्यवरांच्या उपस्थितीत पाहताना खरेच मनातून आनंद वाटत होता.


नक्कीच फेसबुकच्या माध्यमातून हा सोनेरी क्षण इतिहासाच्या सुवर्ण पानावर जपून ठेवला जाणार आहे.इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणाऱ्या या सर्व क्रांतिज्योतींना मानाचा मुजरा.आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे विनोद राठोड, जगदीश कुडे व सर्व बालरक्षक जिंदादिल व्यक्तिमत्त्वांचे जाहीर आभार.सौ उषा नळगिरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी रूस्तुम ससाणे, शिक्षणविस्ताराधिकारी गंगाधर राठोड, मुख्याध्यापक कांता गांजुरे, सहकारी शिक्षक पावडे, कल्याणकर, भोसले, सलामे, देशमुख यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)