मुंबई (शालेय वृत्तसेवा):
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांचे 20 टक्के व 40 टक्के अनुदान मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पुरवणी मागणीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. यामुळे पात्र शिक्षकांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
समग्र शिक्षण अंतर्गत राज्याचा हिस्सा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे वेतन, औरंगाबाद भागातील शाळा दुरुस्तीसाठी प्राप्त निधी बाबत, भारतरत्न राजीव गांधी सायन्स सिटी पुणे, चक्रीवादळ यामध्ये नुकसान झालेल्या शाळांचा दुरुस्ती व बांधकामासाठी अनुदान याबाबत आजच्या शिक्षण विभागाचा आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक तरतुदी व उपाय योजना ची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केली.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .