ना. देवेंद्र फडणवीस यांना रवी ढगे यांनी दिले निवेदन
नांदेड ( शालेय वृतसेवा ) :
नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर विधान सभेचे विरोधी पक्षनेते ना देवेंद्र फडणवीस आले असता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र च्या वतीने निवेदन देण्यात आले.
यात सद्या मागील वर्षी पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे यात प्रामुख्याने शुगर ,बी पी , आस्तमा आदि आजारानं ग्रस्त कर्मचाऱ्यांना कोरोना मुळे संसर्ग होऊन अवयव निकामी होऊन मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेले दिसून येतात.जर सर्व विभागाच्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना खाजगी कंपन्याच्या धर्तीवर दर 5 वर्षाला आरोग्य पूर्व तपासणी ही नाविन्यपूर्ण योजना आणली तर कर्मचाऱ्यांचे अकाली होणारे मृत्यू कमी करता येईल,कार्यक्षमता कळेल व वाढवता येईल, एखादा आजार रुद्र रूप धारण करण्याच्या अगोदरच कळाला तर वेळीच उपचार घेता येईल .
यासाठी पैसे हे शासकीय कर्मचारी यांच्या वेतनातून टप्याटप्याने कपात करून योजना त्वरित राबविण्यात यावी तसेच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले असल्याने उपाययोजना करावी अश्या प्रकारचे निवेदन देऊन चर्चा केली असता ना देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला सदरील निवेदन शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संघटक रवी ढगे यांनी दिले.यावेळी खा प्रतापराव पाटील चिखलीकर, मिलिंद देशमुख, साई आस्पत, मनोज नांगरे, संदीप पावडे आदी उपस्थित होते .



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .