विद्यार्थी बनले शिक्षक: खडकी बाजारच्या शाळेत विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 

विद्यार्थी विद्यार्थिनींनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. .



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

हिमायतनगर तालुक्यातील खडकी बा.येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत बुधवारी (दि 15) आठवी वर्गाचा स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. किरण भगत हिने मुख्याध्यापक म्हणून शालेय कामकाज आणि एक दिवसीय प्रशासन चालवले.

       

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठवीच्या विद्यार्थ्याच्या वतीने स्वयंशासन दिनाचे आयोजन केले होते. मुख्याध्यापक म्हणून किरण भगत यांनी कामकाज पाहिले. प्रारंभी मुख्याध्यापक भुतनर सरांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, यशस्वी जीवनाची पायाभरणी ही शालेय शिक्षणातूनच होते. नंतरच्या काळात उच्च शिक्षण घेतानाच निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच पुढील वाटचाल केली पाहिजे.


विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून, भविष्याला आकार देणारी रूची, कला दर्शविणारे एक प्रतीक असते. मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते. स्वयंशासन हा एकदिवसीय अनुभव अन् आनंद वाढवणारा असतो. तसेच भविष्यात यशाची दिशादर्शक ठरतो म्हणून विद्यार्थ्यांनी ही आठवण आयुष्यभर जपतो. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी इ 1 ली ते 7 वी या वर्गांना अध्यापन केले.


या वेळी विद्यार्थ्यांनी प्रथमच शिक्षक म्हणून भूमिका पार पाडताना जबाबदारीने संपूर्ण दिवस शाळा साभांळली. उपमुख्याध्यापक राजवर्धन किनरवाड व शिक्षक म्हणून जान्हवी सोळंके, श्रावस्ती भगत,मंजुषा येरेकार , तेजस्विनी जांभळे, कोमल सूर्यवंशी, वैष्णवी जाधव,गायत्री सुर्यवंशी, रुपाली ढगे,सोनाली ढगे, सिमरन शेख, संजिवनी सोनकांबळे,प्रगती भुरे, प्रांजली कलाले,गायत्री दुधडे,पायल कलाले,दिक्षा चवरे,पुजा अडगेवाड,आरती शिरगिरे, पल्लवी ढगे,नमन गड्डमवार,सोहम राहुलवार,विक्रम दंतेवाड,विनायक गड्डमवार, उज्ज्वल हनवते,सुफियान शेख,सुमित रावते आदी मुलांनी दिवसभर अध्यापन ते शालेय कामकाजाची पाहणी केली. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव निरोपाच्या वेळी कथन केले. 

कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक भुतनर माधवराव, सहशिक्षक श्याम रायवार, सतिश इंगळे, गणेश राचुरे,शंकर जाधव, इम्रानखान पठाण, नागनाथ नागरगोजे, अमोल जाधव व श्रीमती माळी मॅडम  यांनी मार्गदर्शन केले. मुलांना शिकत असतानाच जबाबदारीची जाणीव व्हावी, शिक्षकांचे कष्ट समजावेत हा हेतू यामागे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)