चिमुकल्यांने केली गाडगे बाबांची वेशभूषा !
नांदेड ( शरद जोगदंड ) :
स्वच्छतेचे पुजारी संतश्री गाडगेबाबा महाराज यांची जयंती मुखेड तालुक्यातील जिजाऊ ज्ञानमंदिरात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना दिनविशेषा नुसार दैनिक परिपाठातून विविध सण ' उत्सव व जयंती निमित्त विविध महापुरुषांच्या कार्याची ओळख होत असते . यातून विद्यार्थ्यांच्या मनावर एक चांगला सकारात्मक विचारांचा प्रभाव पडत असतो . यातून नकळतपणे विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होत असतात . हा सकारात्मक बदल विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना चालना देत असतो. यातून विद्यार्थ्यांचा मानसिक व भावनिक विकास वृद्धिंगत होत असतो. त्यातून त्यांच्या आवडीनिवडी व कल लक्षात येतो. ह्याच गोष्टी विचारात घेवून जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूलमध्ये दैनिक शैक्षणिक अभ्यासक्रमा बरोबरच दिनविशेषा नुसार महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. याचाच भाग म्हणून दि २३ रोजी स्वच्छतेचे पुजारी संतश्री गाडगे बाबा महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
दिनक्रमानुसार आज इयत्ता नर्सरी चा परिपाठ होता. त्यानुसार मार्गदर्शक वर्गशिक्षिका सौ. विजयालक्ष्मी जाधव मॅडमच्या मार्गदर्शनाखाली श्रेयस चिटगीर , गणेश मोरे, यश ओगले व एल केजी मधून आरव गोपनर हे विद्यार्थी संत गाडगे बाबांच्या वेशभूषेत आले होते. त्यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे त्यांच्या आवडीचे भजन गावून कार्यक्रमाची सुरुवात केली. संचालक ज्ञानोबा जोगदंड व मुख्याध्यापक जगदीप जोगदंड यांनी संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन केले. इयता तिसरीतील बैष्णवी बेलाडे या मुलीने संत गाडगे बाबा यांचे जीवन व कार्य या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी वर्गातील अंतर्गत व बाह्य स्वच्छता स्वतः विद्यार्थ्यांनी केली.
यानिमित्ताने शाळेतील व परिसरातील स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपापल्या घर व अंगणाची स्वच्छता केल्याचा फोटो ग्रुपवर टाकण्यासंबंधीची सूचना देण्यात आली. स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे हा स्वच्छतेचा संदेश या निमित्ताने विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्साहातून विद्यार्थ्यांना आनंद तर मिळतोच पण त्यामुळे अभ्यासासाठीची नविन उर्जा मिळत असते. यावेळी मुख्याध्यापक जगदीप जोगदंड यांनी जीवनात स्वच्छतेचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड यांच्या भाषणानंतर व स्वंयरचित ' गाडगेबाबा ' या कविता गायनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. पर्यवेक्षक सुधाकर जोगदंड यांच्या मार्गदर्शना खाली सर्व वर्गशिक्षकांच्या सूचनेनुसार आपापल्या वर्गाची अंतर्गत स्वच्छता करण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .