जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त युवा प्रतिष्ठान व रेल्वे स्थानक यांच्या वतीने संयुक्त जनजागृती उपक्रम

शालेयवृत्त सेवा
0

प्रवाशांची अचानक तपासणी झाल्यामुळे  तंबाखू सेवन करणाऱ्यांची उडाली तारांबळ 


                  

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सलाम मुंबई फाउंडेशन युवा प्रतिष्ठान नांदेड व रेल्वे प्रशासन नांदेडच्या वतीने  रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती पोस्टर्स, तंबाखूमुक्त चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या परिचयातील लोकांकडून  तंबाखू मुक्त करण्यासाठी  स्वाक्षरी अभियान, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत करणे,  सापशिडी या खेळाच्या  माध्यमातून तंबाखू मुक्त चळवळीचा घटक म्हणून काम करणे आधी उपक्रमांनी  जागतिक तंबाखू विरोधी दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी  रेल्वे स्थानकात  फेरी मारून  युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा तंबाखूमुक्त शाळा अभियानाचे जिल्हा समन्वयक रवी ढगे  व रेल्वे स्थानकाचे मुख्य स्वास्थ निरीक्षक नवल कुमार  यांनी सर्व प्रवाशांना जागतिक तंबाखू विरोधी दिनाची संकल्पना  जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली टॅगलाईन  अन्न हवे आम्हाला तंबाखू नको  याविषयी  तसेच भारतीय रेल्वेचे स्वच्छतेवर अंदाजे 1200 कोटी रुपये खर्च होतो   यात प्रामुख्याने  तंबाखूजन्य पदार्थ खाऊन  रेल्वे स्थानकाच्या असो रेल्वेची असो  कोपरे रंगवण्याचे काम  तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांकडून वारंवार होते  या भागाची स्वच्छता करण्यासाठी  विशेष परिश्रम  स्वच्छता कर्मचाऱ्यांना घ्यावे लागतात  हे अत्यंत अशोभनीय गोष्ट आहे  त्यामुळे सर्व प्रवाशांनी जागरूक होऊन  सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान तंबाखूजन्य पदार्थ खाऊन  कोणी वावरत असेल   त्यास प्रतिबंध घालावा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 बाबत त्याला माहिती द्यावी  जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत  जर कोणी तंबाखूचे व्यसन सोडू इच्छित असेल  त्या सर्वांसाठी हेल्पलाइन आहे  हेल्पलाइन चा वापर करावा असे आवाहन दोघांनी केले.

 यानंतर मनोरंजनातून तंबाखू मुक्तीकडे  यासाठी  चला मुंबई फाउंडेशन ने विकसित केलेल्या साप शिडी  या खेळाचा आनंद विविध प्रवाशांनी घेतला  स्वाक्षरी उपक्रमात  प्रवाशांनी व अधिकाऱ्यांनी  कृतीयुक्त सहभाग नोंदवून  रेल्वे स्थानक परिसराचे वातावरण तंबाखूमुक्त  केले अशा प्रकारच्या उपक्रमामुळे  तंबाखूजन्य पदार्थ खाण्यांवर प्रतिबंध येईलच्या भावना प्रवासी व्यक्त करत होते. नंतर सर्व प्रवाशांची  तपासणी करण्यात आली यामुळे तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या   प्रवाशांची तारांबळ उडालेली दिसली ज्यांच्याजवळ तंबाखूजन्य पदार्थ आढळला त्यांच्याकडून ते हस्तगत करून  त्यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत सुद्धा करण्यात आले.   

सदरील अभियान यशस्वी करण्यासाठी  युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा  तंबाखूमुक्त शाळा अभियानाचे समन्वय रवी ढगे, रेल्वे स्थानकाचे मुख्य स्वास्थ निरीक्षक नवल कुमार, युवा प्रतिष्ठानचे  मंगेश मोतेवार, साईप्रसाद अस्पत , स्काऊट गाईड चे मुख्य प्रशिक्षक  रमेश फुलारी, अविनाश हंबर्डे, विश्वनाथ पांचाळ, वेदांत हंबर्डे, पांडे सर,  डॉ प्रशांत तावडे ,रेल्वेचे  अधिकारी स्वच्छता कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. सदरील उपक्रमात  जिल्हाधिकारी कार्यालय, तंबाखू नियंत्रण संस्था, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, इंडियन डेंटल असोसिएशन आदी सामाजिक संस्थांचा सहभाग  होता.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)