अखिल भारतीय शिक्षक साहित्य ,कला व क्रीडा मंडळाचे पुर्नगठन..
नांदेड ( प्रतिनिधी ) :
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाची नांदेड जिल्हा कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली. कार्याध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक वीरभद्र मिरेवाड तर जिल्हाध्यक्षपदी कलासक्त शिक्षक मिलिंद जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शिक्षकांच्या साहित्य कला व क्रीडा गुणांच्या समृध्दीसाठी व वाव देण्यासाठी राज्यस्तरावर शिक्षकांचे अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला व क्रीडा मंडळ कार्यरत आहे. या मंडळाद्वारे राज्यभरातील कार्यरत शिक्षकांसाठी भरीव उपक्रम घेतल्या जातात. शिक्षक साहित्य संमेलने, कवी संमेलने, गायन वादन, नृत्य नाट्य, चित्र शिल्पकलेचे प्रदर्शने, क्रीडा स्पर्धा अशा कार्यक्रमातून शिक्षकांच्या कलागुणांचा विकास साधल्या जातो. विद्यार्थ्यांना विविध संस्कार देत असतांना शिक्षक कला, साहित्य, क्रीडा गुणांनी संपन्न असावा यासाठी धडपडणे हा या मंडळाचा मुख्य उद्देश आहे.
नूकत्याच झालेल्या निवडबैठकीत नांदेड जिल्हा कार्यकारणी गठित करण्यात आली. कार्याध्यक्षपदी प्रसिध्द साहित्यीक कवी विरभद्र मिरेवाड यांची व जिल्हाअध्यक्षपदी कलासक्त शिक्षक मिलिंद जाधव यांची सर्वानूमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून उपक्रमशिल शिक्षिका अनिता दाणे व स्तंभलेखक नासा येवतीकर तर सचिवपदी गझल गायक रूपेश मुनेश्वर यांची निवड करण्यात आली. सहसचिव म्हणून राणी नेमाणीवार, कोषाध्यक्षपदी गझलकार सन्मित्र चंद्रकांत कदम, संघटक म्हणून गझलकारा दिपाली कुलकर्णी, प्रल्हाद तेलंग, साहेबराव डोंगरे, ज्योती रावते, प्रसिद्धी प्रमुख तंत्रस्नेही शिक्षक अनिल कांबळे आणि विलास कोळनूरकर यांची निवड करण्यात आली.
मंडळाचे राज्याध्यक्ष तथा संस्थापक नटराज मोरे (मुंबई), मराठवाडा विभागीय अध्यक्ष राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर, सचिव शेषेराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारणीचे पूनर्गठण करण्यात आले. या निवडी बद्धल जिल्ह्यातील कला साहित्य व क्रीडा वर्तुळातील शिक्षक, रसिकांनी अभिनंदन केले आहेत. यावेळी रवी ढगे ( लोहा ), मिलिंद कंधारे ( माहूर ), रामस्वरूप मडावी ( किनवट ), मनोहर बसवंते ( हदगाव ), प्रल्हाद जोंधळे ( उमरी ), यूसूफ शेख ( कंधार ), पंडीत तोटेवाड ( भोकर ) यांची देखील तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उर्वरीत तालुक्यात लवकरच कार्यकारणी निवडण्यात येतील असे जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासास शिक्षकांच्या अंगी असलेल्या वैविध्यपूर्ण कला गुणांचा निश्चितच हातभार लागेल असा विश्वास आहे. शिक्षकांसाठी मंडळाच्या वतीने कविता लेखन, गझल लेखन, नाटय, चित्र, कथा लेखन कार्यशाळा आणि क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील. माहूर येथे झालेल्या यशस्वी संमेलनानंतर येत्या शैक्षणिक वर्षात नांदेड येथे ' शिक्षक साहित्य संमेलन ' घेण्याचा माणस आहे.
- रमेश मुनेश्वर
( राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा मराठवाडा विभागीय अध्यक्ष )



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .