स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांच्या बलिदानाचे जाण ठेवा - प्रा. लता जाधव

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

येथील गोविंदेश्वर प्राथमिक शाळा खंडोबा चौक नांदेड येथे ७६वा   भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री स भु क म वि  छत्रपती संभाजी नगर येथे  प्राध्यापक लता जाधव यांनी आपल्या भाषणातून आपल्याला  स्वातंत्र्यात मिळवून देणाऱ्या शूर वीरांचे थोर महापुरुषांचे बलिदानांची  जाण ठेवावी. आणि त्यांच्यासारखे आदर्श व्यक्तिमत्व आपल्या अंगीकार करावे असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव आर जे दिग्रसकर  उपस्थितीत होते. तसेच प्रमुख पाहुणे बंसल कोचिंग क्लासेसचे व्यवस्थापक शिंदे सर  प्रमुख अतिथी श्रीम. कोमल राठोड पोलीस कॉन्स्टेबल भाग्यनगर नांदेड रुग्णसेविका गोदावरी कांबळे  योगेश माने हे उपस्थित होते. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी निमित्त शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या यात निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा सामान्यज्ञान स्पर्धा भाषण स्पर्धा घेण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांचे वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले. 

या कार्यक्रमाला सर्व शिक्षकांनी सहकार्य केले तसेच शाळेतील शिक्षिका संध्या सिंदगीकर यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना अल्पोपहार म्हणून पुलाव भात आणि मोतीचूरचे लाडू वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा दिग्रसकर यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक पालक सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)