अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचा उपक्रम !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ (नोंदणीकृत) तालुका शाखा किनवट -माहूरच्या वतीने गटशिक्षणाधिकारी कार्यालय किनवट येथील गटसाधनकेंद्रात शब्द सुरांचा संगम "गीतकाव्य दीपोत्सव २०२४ " कार्यक्रम हर्षोल्हासात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूलचे प्राचार्य तथा चित्रपट दिग्दर्शक एस.व्ही. रमणराव यांनी केले. मराठवाडा विभागीय सचिव शेषराव पाटील आणि वामनदादा संगीत अकादमीचे संस्थापक सुरेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रथम सत्रात निमंत्रीत कविंचे कवीसंमेलन 'काव्योत्सव ' आणि दुसऱ्या सत्रात कराओके गीतगायन 'गीतोत्सव ' घेण्यात आला. दोन सत्रात घेण्यात आलेल्या या गीतकाव्य दीपोत्सवाचे बहारदार सूत्रसंचालन जिल्हासचिव रुपेश मुनेश्वर यांनी केले तर आभार माहूर तालुकाध्यक्ष मिलिंद कंधारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किनवट तालुकाध्यक्ष रामस्वरूप मडावी, भूमय्या इंदूरवार, मुन्ना थोरात, संजय जाधव, कामराज माडपेल्लीवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी भूमय्या इंदूरवार, सूर्यभान कंधारे, सुरेश पाटील, पांडुरंग शेरे, संजय जाधव, मुन्ना थोरात, प्रणाली कांबळे, रमेश पडगिलवार, गणेश येरकाडे, मिलिंद कंधारे, कुणाल राठोड, सतीश राऊत, आम्रपाली वाठोरे, व्हीए जमादार, किशन परेकार, कामराज माडपल्लीवार, गंगाधर कदम, एसव्ही रमणराव, शेषराव पाटील, रुपेश मुनेश्वर, रमेश मुनेश्वर आदींनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .