नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला मुदतवाढ

शालेयवृत्त सेवा
0

 



अर्जासाठी अंतिम तारीख आता ३० नोव्हेंबर

मुंबई ( उदय नरे ) : 

भारतीय नर्सिंग कौन्सिलने परिचारिकाविषयक विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यातून बीएससी नर्सिंग, एम.एससी नर्सिंग, एएनएम जीएनएम, पीबीबीएस्सी नर्सिंग, पोस्ट बेसिक डिप्लोमा आणि क्रिटिकल केअर अभ्यासक्रम परिचारिका (एनपीसीसी) आदी अभ्यासक्रमांसाठी विद्याथ्र्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. कौन्सिलने प्रवेशासाठी यापूर्वी ३० सप्टेंबरची मुदत दिली होती. त्यानंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत पहिली मुदतवाढ केली. मात्र अजूनही प्रवेश सुरू असल्याने पुन्हा मुदतवाढ दिली आहे.


प्रवेशांमध्ये वाढ होणार?

मार्गदर्शक तत्त्वे जारी केली 

ही मुदतवाढ देताना प्रवेशाबाबत आहेत. त्यानुसार ३१ ऑक्टोबरपर्य झालेले प्रवेश नियमित वर्गातील प्रवेश समजण्यात येणार असल्याचे कॉन्सिलने स्पष्ट केले आहे. तर १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान होणारे प्रवेश हे अनियमित प्रवेश असतील.


याबाबत सूचनांचे काटेकोरपणे | पालन करण्याचे निर्देश नर्सिंग कॉलेजांना देण्यात आले आहेत. दरम्यान, आता पुन्हा मुदतवाढ दिल्यानंतर नर्सिंगच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशांच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)