नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8वी) फेब्रुवारी २०२५ मध्ये हिमायतनगर तालुक्यातील पी.एम.श्री.जिल्हा परिषद हायस्कूल जवळगाव प्रशालेने दरवर्षीप्रमाणे घवघवीत यश संपादन केले आहे.भाग्यश्री प्रदीप पटणे,अक्षरा किशनराव बंडे,मोहिनी विकास पवार,सृष्टी बापुराव पवार,दिव्या दिगंबर दरणे या पाच विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत. या विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस. परीक्षेतही राज्य व सारथी शिष्यवृत्तीधारक होऊन उज्ज्वल यश मिळवत शाळेची दुहेरी यशाची परंपरा कायम राखली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक चंद्रकांत कदम,वसंत गोवंदे,रमेश माळगे,बाबुराव मादसवार, वैजनाथ चेपूरवार,संगमनाथ मुंडकर,महेश पडगीलवार, सारिका येरमवार,वंदना ढोकाडे, सुरेखा गुरुफळे,वैशाली मुस्कावाड,स्वप्नील रामटेके, चिंचबनकर सर, विनोद खानजोडे इत्यादी शिक्षकांचे सखोल मार्गदर्शन लाभले.
सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक मोहम्मद कलीम सर,माजी मुख्याध्यापक शिराळे सर, डी.पी.शेट्टीवार सर,शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत, पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदातर्फे अभिनंदन व कौतुक करण्यात आले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .