अशी दिसते आपली आकाशगंगा

शालेयवृत्त सेवा
0

 



अशी दिसते आपली आकाशगंगा 

Shape of Milkyway galaxy


आपण राहतो त्या आकाशगंगेला मंदाकिनी आकाशगंगा Milkyway galaxy असे नाव आहे. 


यात सुमारे 100-400 अब्ज तारे आहेत. 


आकाशगंगेचा व्यास सुमारे 1 लाख प्रकशवर्षे इतका मोठा आहे. 


आपला सूर्य आणि ग्रहमाला बनून असलेली सूर्यमाला ही आकाशगंगेच्या केंद्रापासून सुमारे 26000 प्रकाशवर्ष दूर ओरायन आर्म ह्या भागात आहे. (चित्रात लाल ठिपका बघा) 


आकाशगंगेचे विविध आर्म म्हणजे सर्पिल आकार बाजू ह्या हजारो तारकागुच्छ एकत्रित येऊन बनलेल्या आहेत. 


ह्या बाजू मध्ये असणारी गॅप ही डस्ट लेन म्हणजे धूलिकणांच्या ढगांनी बनलेली असते जे हजारो प्रकाशवर्षे लांब रुंद असतात. 


हे ढग पृथ्वी प्रमाणे पाण्याचे ढग नसून हायड्रोजन वायू चे ढग असतात ज्यात मोठ्या प्रमाणात धूलिकण फिरत असतात. अशा ढगांच्यात काही ठिकाणी तीव्र गुरुत्वाकर्षण प्रक्रिया सुरु होऊन तिथे नवे तारे बनतात. 


आपली आकाशगंगा मध्यभागी फुगीर आणि बाजूला निमुळती / चपटी होत जाणारी आहे. 


मधला फुगीर भाग सुद्धा दंडगोल पसरला आहे ज्यामुळे आपल्या आकाशगंगेला बार्ड स्पायरल गॅलॅक्सि प्रकार दिला आहे. 


आपण आकाशगंगेचा भाग आहोत त्यामुळे रात्रीच्या आकाशात थेट केवळ एकच भाग आपल्याला कडेने असा दिसतो. edge-on view of spiral arms


हे चित्र कॉम्पुटर आर्ट ने बनवले आहे ज्यात ताऱ्यांचा मॅप आणि इतर आकाशगंगा यांची तुलना करून आपली आकाशगंगा अशी दिसत असेल असा अंदाज वापरून हे चित्र बनवले आहे. 


ह्यात मध्यभागी अक्ष दिसतो त्याच्या भोवती आपली आकाशगंगा फिरत आहे. 

सुमारे 220 किमी / सेकंद वेगाने आपली आकाशगंगा स्वतः भोवती फिरत आहे. 


आकाशगंगेचा असा वक्र आकार आणि वेग ह्याला मुख्य कारण आहे डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी. 

ह्यावर सविस्तर माहिती नंतरच्या पोस्ट मध्ये बघू. 


सूर्यमाला सुद्धा आकाशगंगेच्या प्रतलात पुढे जात आहे त्यावर वेगळी पोस्ट कमेंट मधील लिंक वर वाचा. 


( सौजन्य : आकाशातील गमती जमती fb )

-------------

@followers माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)