शाळा विकासात शिक्षकांनी सक्रिय सहभाग घ्यावा - रुस्तुम आडे

शालेयवृत्त सेवा
0

 



 नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

आपण ज्या शाळेत कार्य करतो त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते वाढीसाठी तसेच बौद्धिक विकासासाठी शारीरिक विकासासाठी सतत प्रयत्न करत असतो ज्याप्रमाणे सतत उपक्रमशील राहतो तसेच त्या शाळेच्या विकासातही आपले सक्रिय योगदान असले पाहिजे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेडचे रुस्तम आडे यांनी व्यक्त केले. 


ते गोविंदेश्वर प्राथमिक शाळा अहिल्यादेवी होळकर नगरी खंडोबा चौक तरोडा बु नांदेड येथे शाळेतील इयत्ता १ली ते ७वी तील सर्व विदयार्थ्यांना शाळेतर्फे मोफत गणवेश वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव आर जे दिग्रसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेत पटसंख्यावाढ आणि विद्यार्थी उपस्थित तसेच गुणवत्ता वाढावी यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर आणि सर्व कर्मचारी दिगंबर कल्याणकर सूर्यकांत जाधव शोभा किडे संध्या सिंदगीकर सुग्रीव मोरे सीमा नामवाड दिग्रसकर या सर्व शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. 


या सर्वांनी मिळून शाळेला उपक्रमशील बनवान्यासाठी प्रयत्न केले . शाळेची प्रगती पाहून संस्थेचे सचिव आर जे दिग्रसकर  यांनी समाधान व्यक्त केले. व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेडचे रुस्तुम आडे आणि संस्थेचे सचिव यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)