नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषदेचे राज्य पुरस्कार प्राप्त माध्यमिक शिक्षक डॉ. हेमंत कार्ले लिखित 'लिट्ल ओरियटर्स - इंग्लिश स्पिचेस फाॅर य.' आणि 'लेट्स लर्न इंग्लिश अँकरिंग' या दोन्ही इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी बारड येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रा. डॉ. दिलीप चव्हाण यांची तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे, जि. प. च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, जिल्हा परिषदेचे उप शिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांची उपस्थिती राहणार आहे.
राज्य पुरस्कार प्राप्त डॉ. हेमंत कार्ले यांची दोन्ही पुस्तके इंग्रजी भाषेत असली तरी खास मराठी माध्यमातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहेत. इंग्रजीतून सूत्रसंचालन हे यशस्वीपणे व प्रभावीपणे कसे करावे याचे मार्गदर्शन लेट्स लर्न इंग्लिश अँकरिंग या पुस्तकात सोप्या भाषेत करण्यात आले आहे तर लहान मुलांचा आत्मविश्वास वाढीस लागावा, सर्जनशीलता व संवाद कौशल्य विकसित व्हावे यासाठीचे प्रयत्न लिट्ल ओरियटर्स- इंग्लिश स्पिचेस फाॅर यू. या पुस्तकात करण्यात आले आहेत. मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल बारड प्रशालेत २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वा उपस्थित रहावे असे आवाहन लेखक डॉ. हेमंत कार्ले यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .