“शिक्षणासाठी पुढाकार – संतोष सवडे यांची इमारत बांधणीसाठी देणगी”

शालेयवृत्त सेवा
0



“शिक्षणासाठी खारीचा वाटा — संतोष सवडे यांचे योगदान”


जालना ( शालेय वृत्तसेवा ) :

श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या जालना शाखेच्या इमारत बांधणीसाठी संस्थेचे शिक्षक श्री. संतोष तेजराव सवडे यांनी ₹21,000/- ची देणगी सुपूर्द केली.


ही देणगी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे यांना विद्यार्थी संसद उद्घाटन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा या विशेष कार्यक्रमात स्वाधीन करण्यात आली. लोकआश्रयावर उभी असलेली ही संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखली जाते. मात्र, वाढत्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आवश्यक असलेली शाळेची इमारत बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.


यावेळी बोलताना श्री. संतोष सवडे म्हणाले की – “संस्था समाजासाठी कार्य करते, त्यामुळे माझ्याहीकडून खारीचा वाटा असावा.” त्यांनी पुढे सांगितले की, २०१८ मध्ये कुंभार पिंपळगाव येथील इमारत बांधकामासाठीही अकरा दिवसांचे वेतन देऊन मदत केली होती, आणि त्याच भावनेतून आज जालना शाखेसाठी ही देणगी दिली आहे.


सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी या देणगीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले. “देणगीची रक्कम किती आहे हे महत्त्वाचे नाही, तर समाजासाठी योगदान देण्याची भावना हीच खरी मौल्यवान असते,” असे ते यावेळी म्हणाले.


तसेच या प्रसंगी स्थानिक शालेय समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. ज्योती धर्माधिकारी, मुख्याध्यापक श्री. एम. एस. बिरहारे, उपमुख्याध्यापिका श्रीमती नीलिमा दंडे व पर्यवेक्षक श्री. एस. जी. गायकवाड,श्री बंडेराव देशमुख यांनीही श्री. सवडे यांच्या योगदानाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)