शालेय बालसभेने केले बापुजी आणि शास्रीजींना अभिवादन

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

 राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त जवळा येथील शालेय बालसभेने म. गांधी आणि शास्रीजींच्या प्रतिमांना पुष्पवंदन करुन अभिवादन केले. यावेळी चिमुकल्यांसह जि. प. शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, माजी सरपंच साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले, धनराज गोडबोले, हैदर शेख, मनिषा गच्चे, बालाजी पांचाळ यांची उपस्थिती होती. 


संपूर्ण देशभरात 'स्वच्छता हीच सेवा' हे दैंनदिन उपक्रमांना गती देण्याकरिता ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा योग्य सन्मान करण्यासाठी, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामाजिक दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि त्यांच्या कामापासून अनेकांनी स्वच्छतेची प्रेरणा घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून दि. १ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत एक तारीख एक तास हा स्वच्छता श्रमदान उपक्रम जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राबविण्यात आला. 



          'स्वच्छता ही सेवा' अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालय व परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाबरोबरच १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत जवळा देशमुख येथील जि.प. शाळा आणि ग्राम पंचायत कार्यालय परिसरात मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली ''स्वच्छता ही सेवा'' उपक्रम राबविण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये सुरु असणाऱ्या या अंतर्गत जवळा देशमुख येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वच्छता हीच सेवा हा पंधरवडा साजरा करण्यात आला. याचा २ आॅक्टोबर रोजी म. गांधी आणि शास्रीजींच्या जयंतीचे औचित्य साधून समारोप करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)