सुपरमून म्हणजे काय ? | Supermoon

शालेयवृत्त सेवा
0

 



सुपरमून म्हणजे काय ? (Supermoon)


पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह (Natural Satellite) म्हणजे चंद्र, हा पृथ्वी भोवती लंब वर्तुळाकार कक्षेत (Elliptical orbit) फिरतो. 


चंद्राला पृथ्वी भोवती १ फेरी पूर्ण करण्यासाठी साधारण 28 दिवस लागतात. 


पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा लंब वर्तुळाकार असल्याने दोन असे स्थान येतात जेंव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ आणि दुसऱ्यावेळी पृथ्वीपासून दूर असतो. 


चंद्राच्या पृथ्वीजवळ असल्याने आकाशात त्याचा आकार थोडा मोठा दिसतो, आणि दूर असल्यास त्याचा आकार छोटा दिसतो. 

परंतू आकारातील हा फरक सध्या डोळ्यांनी समजून येत नाही त्यासाठी एकाच प्रकारचा कॅमेरा आणि दुर्बीण वापरून दोन वेगवेगळ्या वेळी घेतलेल्या पूर्णचंद्राच्या फोटो ची तुलना करून आपण हा आकारातील फरक बघू शकतो. 


अशा प्रकारे ज्यावेळी पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या जवळ (Perigee) असतो त्याला सुपरमून (Super-moon) असे नाव दिले आहे. 

त्याच्या विपरीत जेव्हा पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीपासून दूरच्या बिंदू (Apogee) वर असतो तेव्हा तो "मिनी मून" (Mini-moon) अशा नावाने ओळखला जातो.

वास्तवात सुपरमून आणि मिनी मून ही पौर्णिमेच्या चंद्राची प्रतीकात्मक नावे इंटरनेट मीडियामुळे प्रचलित झाली आहेत. 


खगोलशात्रीय संकल्पने प्रमाणे पृथ्वीच्या जवळच्या बिंदूवर चंद्र आल्यास त्याला पेरीजी मून (Perigee moon) आणि पृथ्वीच्या दूरच्या बिंदूवर चंद्र आल्यास त्याला अपोगी मून (Apogee moon) असे म्हणतात. 


प्रत्येक महिन्यातून एकदा चंद्र पृथ्वीच्या जवळ आणि एकदा पृथ्वीपासून दूर असणाऱ्या बिंदूंवर असतो, पण त्याच वेळी पौर्णिमा असतेच असे नाही, म्हणून जेव्हा पेरीजी बिंदूवर (Perigee) पौर्णिमेचा चंद्र असेल तरच त्याला सुपरमून म्हणतात.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)