चंद्रकांत कदम यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार!

शालेयवृत्त सेवा
0

 



चंद्रकांत कदम यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार!


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

आजच्या अस्वस्थ वर्तमानात वाचन चळवळ वाढीस लागण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून संवेदना फाऊंडेशन व महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज (MPL NEWS) संयुक्त विद्यमाने कालवश उत्तमराव पंडित यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय संवेदना साहित्यरत्न पुरस्कारांसाठी साहित्यिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.पुरस्कारांचे हे पहिलेच वर्ष आहे.सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह म्हणून नांदेड येथील प्रसिद्ध गझलकार चंद्रकांत देवराव कदम (सन्मित्र) यांच्या "समतेच्या डोहाकाठी" गझलसंग्रहास "राज्यस्तरीय संवेदना साहित्यरत्न पुरस्कार" घोषित करण्यात आला आहे.


सर्व पुरस्कारार्थींना ५ नोव्हेंबर २०२५ रोजी हिमायतनगर येथे समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे.प्रस्तुत गझलसंग्रह गझलनवाज भीमराव पांचाळेंच्या हस्ते प्रकाशित झाला असून याआधी अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहे.गझलकार चंद्रकांत कदम उच्च विद्याविभूषित,उपक्रमशील शिक्षक असून सध्या जि.प.हायस्कुल जवळगाव ता.हिमायतनगर येथे कार्यरत आहेत.संवेदनशील गझलकार,सूत्रसंचालक म्हणून त्यांचा राज्यभर लौकिक आहे.त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)