५३व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री स.भु. प्रशालेची विजेतेपदाची हॅटट्रिक!

शालेयवृत्त सेवा
0



जालना ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूरचे शिक्षण विभाग, पंचायत समिती जालना आणि सेंट जॉन्स हायस्कूल व रायन इंटरनॅशनल स्कूल, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री सरस्वती भुवन प्रशाला , जालना ने दणदणीत यशाची नोंद केली.


१) प्राथमिक विद्यार्थी गट :- प्रथम क्रमांक - श्री स.भु. प्रशाला, जालना – मुकुंद विजयानंद झोळगीकर.

२) शैक्षणिक साहित्य गट (माध्यमिक) :- प्रथम क्रमांक - श्री अंभुरे योगेश भरतराव (श्री स.भु. प्रशाला).

३) शैक्षणिक साहित्य गट (प्राथमिक) :- तृतीय क्रमांक - श्रीमती पवार एस. पी. (श्री स.भु. प्रशाला).


दि. 25/11/2025 रोजी सेंट जॉन हायस्कूल व रायन इंटरनॅशनल स्कूल, जालना येथे पार पडलेल्या या 53 व्या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी गटात प्रथम, माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गटात प्रथम आणि प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गटात तृतीय अशी एकूण तीन विजेतेपदे पटकावत प्रशालेने ‘हॅटट्रिक’ साधली. सर्व विजेत्यांचा गौरव पंचायत समिती जालना येथील गटशिक्षणाधिकारी श्री. कोल्हे सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.


या यशाबद्दल शालेय समितीच्या अध्यक्षा प्रा . डॉ . ज्योती धर्माधिकारी , मुख्याध्यापक श्री. बिरहारे एम. एस. तसेच उपमुख्याध्यापक श्री. पाडळे युवराज यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)