जालना ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 मध्ये श्री सरस्वती भुवन प्रशाला, जालना येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रशालेचा गौरव वाढवला.
या महोत्सवातील चित्रकला स्पर्धेत १२वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. श्रावणी हिवरे हिने उत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या उज्वल कामगिरीबद्दल तिला ₹3000 चे नगद पारितोषिक तसेच स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
त्याचबरोबर, प्रभावी कलाकृती सादर करणाऱ्या कु. प्राची हिला द्वितीय क्रमांक, ₹2000 नगद पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या गुणवंत विद्यार्थिनींना प्राध्यापक बालासाहेब खरबे आणि श्री आशिष हेलगे यांचे मार्गदर्शन लाभले .
या स्पर्धेत आमच्या प्रशालेचे कलाशिक्षक श्री. अशीच हेलगे यांनी परीक्षक म्हणून अत्यंत बारकाईने व निष्पक्षपणे काम पाहिले. त्यांच्या कार्याची दखल घेत आयोजकांकडून त्यांचाही सत्कार व सन्मान स्मृतिचिन्हाने करण्यात आला. हा यशाचा बहुमान गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आला.
या दुहेरी विजयाबद्दल स्थानिक शालेय समिती अध्यक्ष प्रा . डॉ .ज्योती धर्माधिकारी मुख्याध्यापक श्री. बिरहारे एम. एस., उपमुख्याध्यापक श्री. युवराज पाडळे ,उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री रमाकांत कुलकर्णी यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे आणि मार्गदर्शक प्रा . बालासाहेब खरबे, परीक्षक म्हणून योगदान देणाऱ्या आशिष हेलगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रावणी, प्राची आणि श्री बालासाहेब खारगे व आशिष हेलगे यांच्या— योगदानाने सरस्वती भुवन प्रशालेचा मान अभिमानाने उंचावला!


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .