इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा 2025 चा ‘बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड’ शीतल भालेकर यांना प्रदान..

शालेयवृत्त सेवा
0

 



नवी दिल्ली ( शालेय वृत्तसेवा ) : 

शिक्षणक्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली च्या वर्धापन दिनानिमित्त  दरवर्षी ‘बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड’ प्रदान करते. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी 2025 साली नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सावळी ता. बिलोली येथे कार्यरत असलेल्या शीतल भालेकर यांची निवड झाली.


शीतल भालेकर यांनी बनवलेले ‘मॅजिक बॉक्स’ गणित विषयाचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांमध्ये संख्याज्ञान व संख्येवरील 10 मूलभूत क्रियाचे प्रत्यक्ष अनुभवातून आकलन होण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने परीक्षकांकडून उच्च प्रशंसा मिळाली. या साहित्याला यावर्षीचा  तृतीय  पारितोषिक देण्यात आले.


या पुरस्कारांतर्गत त्यांना रु. 5000/- रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा केंद्रीय कौशल्य विकासमंत्री सन्माननीय धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते संपन्न झाला. मुख्य आकर्षण तथा प्रमुख पाहुणे म्हणून कॅनडा चे प्रसिद्ध प्राध्याकप पिटर स्कॉट हे उपस्थित होते. या वेळी IGNOU च्या कुलगुरू मा. उमा कांजीलाल यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व शिक्षणातील नवकल्पनांचे महत्त्व अधोरेखित केले.


हा भव्य पुरस्कार समारंभ IGNOU च्या नवी दिल्ली मुख्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उत्साहात पार पडला. देशातील 24 क्षेत्रिय संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)