राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी बालसाहित्यिक समाधान शिकेतोड यांची निवड !

शालेयवृत्त सेवा
0

 



पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

        राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांची चौथी राज्यकार्यकारणी सभा रविवारी, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे उत्साहात पार पडली. या महत्त्वपूर्ण सभेत धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राघूचीवाडी (ता. धाराशिव) येथील राज्य व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक, तसेच प्रसिद्ध बालसाहित्यिक समाधान शिकेतोड यांची संघटनेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.


        ही सभा संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेस प्रमुख अतिथी म्हणून विद्या प्राधिकरण सभेचे कार्यवाहक व संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. सतीश गवळी, राज्य प्रवक्ता सुनील गुरव, राज्य सरचिटणीस अनंता जाधव, राज्य सल्लागार परसराम हेंबाडे, राज्य उपाध्यक्ष संभाजी ठुबे, राज्य प्रतिनिधी भैरवनाथ कानडे , अजय टोले ,  तसेच राज्य व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)