विद्यार्थ्यांच्या हितासाठी चंद्रशेखर भोयर यांनी शिक्षण मंत्र्यांची घेतली भेट !

शालेयवृत्त सेवा
0



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्यात वाढत असलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून वार्षिक परीक्षा लवकर घेण्याची मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी केली. यासाठी त्यांनी आज शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या नियोजनानुसार इयत्ता २ री ते ८ वीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहेत. मात्र एप्रिलमध्ये उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे भोयर यांनी निवेदनात नमूद केले.


विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक विद्यार्थी दूरवरून पायी किंवा सायकलने शाळेत येतात. तसेच तीव्र उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता वार्षिक परीक्षा २३ मार्च २०२६ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्याबाबत आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी चंद्रशेखर भोयर यांनी केली. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)