शालेय शिक्षण विभागाच्या विविध विषयांची सविस्तर आढावा संपन्न...

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

        राज्यातील शासकीय शाळांचा दर्जा अधिक उंचावून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन आज मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत केले.


        या बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, उपसचिव तुषार महाजन यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


       यावेळी आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर शाळा प्रवेशोत्सव, विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण, शाळांमधील मूलभूत सुविधा, विद्यार्थी सुरक्षा, शिक्षक भरती, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


       बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, मागील वर्षी राज्यभर राबविण्यात आलेल्या शाळा प्रवेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षीही शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा. तसेच विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी दर्जेदार गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे.


        शाळा सुरू होण्यापूर्वी परिसर स्वच्छता, वर्गखोल्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ स्वच्छतागृहे तसेच विद्यार्थिनींसाठी पिंक रूमची सुविधा उपलब्ध करण्याबाबत त्यांनी विशेष सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी दिले.


        बालभारतीमार्फत सुमारे ८० टक्के पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचली असून उर्वरित पुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही दिले.


     शाळांमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर नव्हे तर कला, क्रीडा, अभिनय, संगीत, वक्तृत्व अशा विविध कौशल्यांच्या विकासावर भर देण्याचे आवाहन केले. जवाहर बालभवनच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.


      शाळांच्या विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) तसेच माजी विद्यार्थी संघटनांचे सहकार्य घेण्याचे आवाहन करताना जिल्हा परिषद शाळांच्या परिसरात अंगणवाड्या सुरू करण्यावर भर दिला. यामुळे भविष्यात शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढण्यास निश्चितच मदत होईल, असे सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)